
लोहा| देव कोणी पहिला काय (?) असे अनेकदा विचारले जाते.पण होय देव मी पाहिलं असे ठामपणे राजू धुतमल हा सांगतोय..आपण अचंबित व्हाल पण हे खरे आहे. राजू धुतमल यांचा बावीस वर्षीय मुलगा सागर याला मोठा हार्टअटॅक आला. त्यास तात्काळ लोटस मध्ये ऍडमिट केले. हृदयविकार इतका तीव्र होता की सहा वेळा त्या विद्यार्थ्यांचे हृदय बंद पडले परंतु लोह्याचे भूमिपुत्र डॉ राहुल घंटे, लोटसचे संचालक डॉ पडलवार यांनी शर्थीचे प्रयत्न केले व सागरला जीवनदान मिळाले.सुट्टी होताना त्याच्या आई वडिलांचे डोळे पाणावले आणि डॉक्टरांच्या रूपाने तुम्ही देवदूत आहेत. अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.


राजू बाबाराव धुतमल हा धानोरा मक्ता (ता लोहा) येथील राहणार तो एसटी मध्ये ड्रायव्हर आहे सध्या सिडको नांदेड येथे वास्तव्याला आहे. २६ मार्च रोजी भावांचे बायपास झाल्याने सुट्टी होणार म्हणून तो व त्याचे कुटुंब लोटस हॉस्पिटलमध्ये होते. तेवढ्यात त्याचा बावीस वर्षीय मुलगा सागर जो की लातूर येथे एमसीए च्या अंतिम वर्षाला आहे/ त्याला छातीत तीव्र वेदना होताहेत असा फोन आला. समोरील डॉक्टर याना दाखवले त्या डॉक्टरांनी तात्काळ नांदेडला हलविण्यास सांगितले. सोबत दहा हजार रुपये दिले जेणेकरून पैशा अभावी या तरुणावर होणारे उपचार थांबू नयेत या उदात्त व आपुलकीने सहकार्य केले.


लोटस येथे तात्काळ दाखल केले .हॉस्पिटल चे संचालक डॉ संजय पडलवार लोह्याचे भूमिपुत्र प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉ राहुल घंटे यांनी सागर या बावीस वर्षीय तरुणांवर तात्काळ उपचार सुरू केले. एवढया कमी वयात आणि इतका जोराचा हृदय विकाराचा झटका पासून आरंभी डॉक्टर सुद्धा अचंबित झाले. पण उपचारा दरम्यान सहा वेळा हृदय बंद पडले पण डॉ राहुल घंटे व टीमने या तरुणाला जीवदान दिले आठ दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता.


सुरुवातीचे तीन दिवस त्याची प्रकृती अतिशय धोकादायक होती लोटस हॉस्पिटल प्रशासनाने कॉर्डियोलॉजिस्ट डॉ परविंदरसिंग ( नांदेड) व कॉर्डियोलॉजिस्ट डॉ अनिल गवळी( औरंगाबाद ) यांच्या निगराणी खाली उपचार सुरू ठेवले .या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले या काळात वडील राजू आई नातेवाईक अक्षरशः रात्रभर बसून होते. तीन दिवस त्याची मनाची घालमेल सुरू होती पण रविवारी(२ एप्रिल) रोजी रुग्ण सागर यास सुट्टी झाली.मुलाला जीवदान दान देणारे लोटस चे संचालक डॉ संजय पडलवार, हृदयरोग तज्ज्ञ डॉ राहुल घंटे याने रुग्णाचे आई वडील यांनी ऋण व्यक्त केले व सत्कार केला.

त्यावेळी वडील राजू व त्याची पत्नी यांचे डोळे पाणावले होते सागर बरा व्हावा म्हणून जीवापाड परिश्रम घेणारेअतिदक्षता विभागातील सहकार्य करणारे डॉ प्रविन गजभारे, डॉ अतुल टोके, डॉ गच्चे व सर्व स्टॉप चे त्यांनी आभार मानले या काळात राजुला रात्रभर मला धीर देणारे एस टी महामंडळाचे अधिकारी संजय वाहुळे व सोबतचे चालक वाहक टीम, पत्रकार रघुनाथ बनसोडे( लातूर) हरिहर धुतमल यांचे त्यांनी आभार मानले लोटस हॉस्पिटलच्या डॉक्टरामुळे बावीस वर्षीय विद्यार्थ्यांला जीवनदान मिळाले हे डॉक्टर देवदूतच ठरले.
