
नवीन नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी ९ एप्रिल रोजी अकरा जागेसाठी ज्ञानतिर्थ कर्मचारी विकास व कर्मचारी विकास पॅनल सह अपक्ष उमेदवार यांच्या मध्ये लढत होत असून ९ एप्रिल रोजी मतदान व मतदान संपल्यानंतर मतमोजणी होणार आहे.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दोन पॅनल सह अपक्ष उमेदवार यांच्यात आकरा जागेसाठी हि निवडणूक होत असून एकूण मतदार संख्या ४५९ आहे. ज्ञानतिर्थ कर्मचारी विकास पॅनल व कर्मचारी विकास पॅनल यांच्या सह अपक्ष उमेदवार यांच्यात हि निवडणूक होत असून दोन्ही पॅनलने जाहीरनामा प्रसिद्ध केला असून मतदार यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत आहेत.


या निवडणुकीत सर्वसाधारण गटासाठी सहा जागा, तर दोन महिला व अनुसूचित जमाती प्रवगातुन एक, ईतर मागास प्रवर्ग एक, विमुक्त जाती जमाती,भ.ज .विजा. मतदार संघातून एक अशा अकरा जागेसाठी ९ एप्रिल रोजी स्वारातीम विदयापीठ प्रशासकीय मुख्य इमारत खोली क्रमांक ३११ येथे सकाळी ८ ते ४ मतदान होणार आहे, याच दिवशी सायंकाळी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. या होणाऱ्या निवडणूकीसाठी चुरस निर्माण झाली आहे.

