
भोकर। जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्य साधून येथील शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थिनींनी ग्रामीण रुग्णालयातील बाह्य व आतील परिसराची झाडून पुसून स्वच्छता करण्यात आली. या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


दिनांक ७ एप्रिल रोजी संपूर्ण देशात जागतिक आरोग्य दिंन साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्याने तसेच समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या कल्पनेतील समता पर्व अभियानांतर्गत शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील सर्व विद्यार्थिनिनी येतील ग्रामीण रुग्णालयात जाऊन, वस्तीगृह अधिक्षीका सौ.एस.डी.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाच्या आतील व बाह्य परिसराची तब्बल तीन तास अतिशय सुंदर अशी स्वच्छता केली. त्यांच्या या विशेष योगदानाचे डॉक्टर मंडळी व रुग्णांच्या नातेवाइकांकडून कौतुक करण्यात आले.


यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.अनंत चव्हाण,वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब बिराडे, रुग्ण कल्याण समितीचे एम.ए. रज्जाक सेठ यांनी जागतिक आरोग्य दिनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी नार्लेवाड, विशेष शिक्षक सुधांशु कांबळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक मनोज पांचाळ, मल्हार मोरे,सुजाता नवघरे, राजश्री ब्राह्मणे,ज्योती काळे आदीसह शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहातील सर्व महिला कर्मचारी वृंद व आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

