
हदगाव| हदगाव शहरातील केद्रिय जि.प.कन्या शाळाचे ऐन मुलीच्या परिक्षाच्या काळात जुने वर्गाचे बांधकाम पाडुन नवीन वर्गाचे काम घाईघाईनं करण्यात येत असल्याचा आरोप संजय खानजोडे यांनी एका निवेदन द्वरे गटशिक्षण अधिका-याकडे केली आहे.


त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर शालेय वर्गाचे बाधकाम शासनाने निर्धारित केलेल्या अंदाज पञका प्रमाणे नमुद केल्या प्रमाणे होत नाही. सदर बाधकाम हे ऐन मुलीच्या परिक्षा काळात हे काम करण्यात येत आहे. परिणाम स्वरुप येथे शिक्षण घेणा-या मुलीना या बांधकाम मटेरियल सिमेंट धुळीचा अत्य़त ञास होत आहे.


आणखीन विशेष म्हणजे इतक्या महत्त्वाच्या कामावर नियुक्त केलेले अभियताने सदर काम त्यांच्या देखरेखखाली होत नसल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणने आहे. जर या प्रक्रणाची चौकशी न झाल्यास आपल्या कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आलेल आहे. विशेष म्हणजे दि.२४ मार्च २०२३ रोजी दिलेल्या तक्रारीची दखल अध्याप ही गटशिक्षण आधिका-याने घेतलेली नाही.

