
नांदेड। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आय.टी.आय कॉलनी (आंब्याच्या झाडाजवळ ) येथील श्री भगवान बालाजीचा चौदावा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 8 व 9 एप्रिल 2023 रोजी करण्यात आले आहे.


दि. 9 एप्रिल 2023 रोजी रविवारी सामाजिक उपक्रमाने हा वर्धापन दिन साजरा केला केला जाणार आहे , दिनांक 8 एप्रिल रोज शनिवारी सायंकाळी 5 वाजता बालाजी मंदिर आय टी आय काॅलनी ते शिव मंदिर चैतन्य नगर परत बालाजी मंदिर अशी “उत्सव मुर्ती” शोभायात्रा काढण्यात येणार आहे.


तसेच रविवारी 9 एप्रिल रोजी सकाळी बालाजी चा अभिशक व पुजा होईल त्यानंतर बारा ते चार महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीमध्ये सर्व भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आय.टी.आय कॉलनीतील बालाजी मंदिर विश्वस्त मंडळांनी केले आहे.

