
नांदेड। तिरुमला तिरुपती देवस्थान व श्रीनिवास कल्याण उत्सव नांदेड समितीच्या वतीने विश्व कल्याण आणि समृध्दीसाठी 22 एप्रिल शनिवारी सायंकाळी 4 ते 9 या वेळेत गट नं.203 निळा रोड ऑक्सफर्ड व ग्लोबल स्कूल जवळ पावडेवाडी नांदेड येथे ‘श्रीनिवास कल्याण उत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. याचे भूमिपुजन नुकतेच पार पडले.


श्री बालाजी कल्याण उत्सवात श्री बालाजी पदमावती आणि लक्ष्मी यांचा शुभविवाह होणार आाहे. तिरुमला येथे जाऊन सर्व भाविक भक्तांना ‘श्रीनिवास कल्याण उत्सवा’त सहभागी होता येत नाही. त्यामुळे तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या वतीने भगवान श्रीनिवासाचा विवाह सोहळा पाहता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाचे भूमिपुजन पार पडले. यावेळी रमेश पारसेवार, राजु पारसेवार, दिलीप कंदकुर्ते, सुभाष कन्नावार, जगनाथ चक्रवार, उत्तम बच्चेवार, धोंडीराम गबाळे, मिलिंद देशमूख, विठ्ठल पावडे, बाबुसिंह चव्हाण, लक्ष्मण येरावार, पी.एन.रेड्डी, सतिष वट्टमवार, रामकृष्ण चक्रवार, विनायक जवादवार, दिगंबर लापशेट्टवार, महेश रेखावार, रमेश बिडवई, व्यंकट कोडगिरे, हरिभाऊ पावडे, श्याम पावडे, तानाजी पावडे, वसंत पावडे यांच्यासह श्री बालाजी भक्तांची उपस्थिती होती.

