
नांदेड। दोन दिवसांनी बिलोली येथे हैद्राबादचे आमदार टी.राजासींह यांची सभा पार पडणार आहे.या सभेपुर्वी दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे संभाषण व्हायरल केल्या प्रकरणी शेख सुलेमान यास अटक करण्यात आली आहे. याचबरोबर जातीय तणाव निर्माण करणारा अन्य एकास अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


दि.९ एप्रिल रोजी बिलोली येथे हैद्राबाद येथील आमदार राजासिंह ठाकूर यांनी धर्मसभा व रँली पार पडणार आहे.यासभेसाठी शहरासह तालुक्यातील हजारो हिंदू समाज बांधव उपस्थित राहणार आहे.या सभेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी करण्यात आली आहे.अशात येथील शेख सुलेमान याने दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे संभाषण व्हायरल केल्याने बिलोली पोलिसांनी सुलेमान यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले.


जातीय तेढ निर्माण करणारे काही व्यक्ती माध्यमाचा सहारा घेत आहेत. यातच सुलेमान याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण केल्याच्या कारणावरून 505/2 नुसार गुन्हा दाखल झाला असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे विधिक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या युवकांना एकत्र करून त्रस्त करणारा अन्य एक व्यक्ती याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. सदर व्यक्ती शेख सुलेमान एवढेच गंभीर स्वरूपाचे अपराध करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान याच प्रकरणातील अन्य एका आरोपीस अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनंतराव नरूटे यांनी सांगितले.

