
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। कला, वाणिज्य महाविद्यालय तज्ञ तज्ञ तज्ञ हे ही हि तज्ञ व विज्ञान महाविद्यालय मारेगाव, शरदचंद्र ए सी एस कॉलेज नायगाव, जि. नांदेड आणि शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परांडा, जि. उस्मानाबाद असे तीन विद्यापीठातील महाविद्यालय एकत्र येऊन “रिसर्च मेथोडोलॉजी इन सोशल सायन्स अँड कॉमर्स” या विषयावर राष्ट्रीय ई-परिषदेचे ९ एप्रिलला आयोजन करण्यात आले आहे.


या परिषदेला उद्घाटक म्हणून प्रोफेसर डॉ. डी. एम. खंदारे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. दिनेश निचित उपस्थित राहणार आहे तसेच प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश घरडे,मारेगाव, प्राचार्य प्रा. डॉ. के हरिबाबू, नायगाव बा. जि. नांदेड आणि प्राचार्य, डॉ. सुनील जाधव उस्मानाबाद ईत्यादी उपस्थित राहणार आहेत तसेच या ई परिषदेचे कन्व्हेनर प्रा. डॉ. संतोष गायकवाड, प्रा. डॉ. संतोष काळे आणि या परिषदेचे सचिव प्रा. डॉ. वैभव कवडे यांनी संशोधकांना या परिषदेसाठी संशोधन पेपर पाठवून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

