
हिमायतनगर। तालुक्यातील सवना ज.येथे गावठाण ड्रोन सर्वे मोजनी व चौकशी काम उपाधीक्षक भूमी अभिलेख आधिकारी.आर .आर. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निमतानदार जी.एस. बारापञे, भूमापक आर.एम. आम्ले, ग्रामसेवक कोंडामंगल ग्राम पंचायत कर्मचारी भारत गुंडेकर आदीने जून्या गावठाणातील 370 घराचे काम सुरु केले आहे.


गावठाण ड्रोन सर्वे मोजनी व चौकशी मध्ये घरोघरी जावून मालमताधारकाची नावे विचारुण मोजणी करणे, मालमत्ता निश्चित करणे, चौकशीचे काम झाल्यावर घराचा नकाशा वमालकी हक्क सनद देणे, नंतर पी.आर. कार्ड देणे,
जि.टी. व चौकशी संयुक्त करित असतांना उपाधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी आर.आर .मोरे यांनी भेट देवून आढावा घेतला. अतिशय पारदर्शक काम भूमीअभिलेखची टीम करित आहे.


गावठाणा बाहेरील मालमत्तेची आताच मोजनी व नोंदणी होणार नसल्याचे एस. आर .बारापञे यांनी सांगीतले आहे. यानंतर ग्रामपंचायत टॅक्स वाढ होण्याची संभवना आहे. 100 रुपयाच्या बाॅडवर ग्रा.प.ला घेतलेले फेरफार नोंदणीद्वारे नमुना नं.8 आदीची नोंदणी भूमापन कार्यालयाला व्हावी अशी मागणीअनेकांनी केली आहे. परंतू यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याने कदाचित थकीत महसूल वसूल होण्याची चर्चा आहे. थकीत महसूल वसूलीनंतर भूअभिलेखला नोंद होण्याची शक्यता आहे.

