
नवीन नांदेड। सामाजिक कार्यकर्ते नितीन स्वामी यांनी आपला वाढदिवसाच्या निमित्ताने अंध विघालय वसरणी येथे शाळेतील विद्यार्थी समवेत वाढदिवस साजरा करून मिठाई वाटप केली या वेळी शाळेतील विद्यार्थी यांनी देशभक्ती पर गिते सादर करीत उपस्थित मान्यवराचे मने गहिवरून आले.


सिडको परिसरातील अनेकांना परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते नितीन स्वामी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ९ एप्रिल रोजी अंध विघालय वसरणी येथे वाढदिवस साजरा करण्याचे निश्चित केल्या नंतर मित्र मनोज जोशी, शुभम घोरबांड, सुदिन हाळेदकर, यांनी तयारी केली व शाळेत मुख्याध्यापक बि. एम. ईबितवार, अधिक्षक मनोजकुमार कलवले,संजय प्रभाकर पाटील, संतोष सावते व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, छायाचित्रकार सारंग नेरलकर यांच्या उपस्थितीत नितीन स्वामी यांच्या सत्कार करण्यात आला.


शाळेतील विद्यार्थी यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आलारे आला, रूद्र पांचाळ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर आधारित काव्य वाचन भावना निंबाळकर, व देशभक्ती पर समुह गित संचाने इतनी शक्ती हामे दैना दाता यासह विविध गिते गाऊन उपस्थित मान्यवरांच्ये मने गहिवरून आली, तर वाढदिवसाच्या निमित्ताने गायलेल्या गीतांनी टाळायचा कडकयात पुषप उधळून वाढदिवस साजरा केला. एकीकडे वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून अंध शाळेत केलेला वाढदिवस हा आनंददायी ठरला.

