
नवीन नांदेड। विश्व हिंदू परिषद बजरंग दल व श्री हनुमान जन्मोत्सव समिती यांच्या तर्फे११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रांगणात भव्य पारंपारिक संस्कृतीक भजन संध्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


सिडको हडको भागात मागील सात वर्षांपासून हिंदु एकत्रिकरण च कार्य चालते जसे दर रविवार मंदिर स्वच्छता अभियान, गौसेवा, साप्ताहिक आरती, हनुमान चालीसा पठण, अश्या विविध माध्यमातून नवीन नांदेड भागात हिंदु एकत्रिकरन चं कार्य चालते यंदा हनुमान जन्मोत्सव निमित्त हडको बस्टॉप येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रांगणात भव्य पारंपरिक संस्कृतीक भजन संध्या सोहळा दिनांक ११ एप्रिल मंगळवार.रोजी सायंकाळी ६ वाजता सुरु होणार आहे.


नांदेड मधील प्रसिद्धी भजन संच प्रभू श्री राम, हनुमान जी महाराज, महादेव, विठ्ठल भगवान यांच्या वर विविध साऊंड सहित गीत सादर करून कार्यक्रम भक्तीमय करतील तरी या ऐतिहासिक हिंदु सोहळ्या मध्ये सिडको हडको भागातील सर्व भक्तगन महिलां वर्ग व हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने कार्यक्रम सहभागी व्हावे असे आवाहन विश्व् हिंदु परिषद बजरंग दल व श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको यांच्या वतीने करण्यात आले आहे.

