
नांदेड। महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा वाटप सिडको हडको परिसरातील आनलाईन नोंद असलेल्या जवळपास ३८०९ लाभार्थ्यांना ८ एप्रिल पासून वाटपास सुरू केली आहे.


महाराष्ट्र शासनाचा वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आनंदाचा शिधा वाटप यात एक किल्लो रवा, साखर, चनादाळ, तेल या चार वस्तु शंभर रुपये मध्ये सवलत दरात स्वस्त धान्य दुकानातून आनलाईन नोंद असलेल्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.


त्यानुसार सिडको हडको परिसरातील गांजापुरकर स्वस्त धान्य दुकानातून ४९९, लांडगे ५००, पवळे ५३५ पेदावाड ७०९,मिसाळ ५३५, बनसोडे ६४९,पांचाळ ३८२ या स्वस्त धान्य दुकानातून सिडको हडको परिसरातील जवळपास ३८०९ लाभार्थ्यांना ८ एप्रिल पासून वाटपास सुरू करण्यात आली असून लाभार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

