नांदेड। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत नांदेड बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील पुणेगांवकर, संचालक नागोराव पाटील, संचालक राम पाटील कदम, उपसरपंच दादाराव पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केल्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना राजकीय धक्का बसला आहे.
नांदेड मार्केट कमिटीवर काँग्रेसचे अधिराज्य सत्ता आहे. या मार्केट कमिटीचे सभापती संभाजी पाटील पुणेगांवकर यांनी काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व झुगारुन लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खा.चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात संभाजी पाटील पुणेगांवकर यांनी आपल्या असंख्य समर्थकासह भाजपात प्रवेश केला आहे. खा.चिखलीकर यांनी संभाजी पाटील यांच्यासह त्यांच्या सर्व समर्थकांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांनी संभाजी पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांना भाजपात प्रवेश दिला असल्याची घोषणा केली.
सभापती संभाजी पाटील पुणेगावकर यांच्यासह मार्केट कमिटीचे संचालक राम पाटील कदम, संचालकत्ता नागोराव पुंडलिकराव पाटील, पुणेगावचे उपसरपंच दादाराव पाटील, विजय कदम, राजेश कदम, बळवंत कदम, रामा खाडे, सुगंध कदम, दादाराव कदम, राजेश्वर कदम, माधव कदम आदीसह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये खा.चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मराज देशमुख, बालाजीराव पाटील पुणेगावकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप कंदकुर्ते, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष शिरसागर, पं.स.चे माजी सभापती मोतीराम पाटील ब्राह्मणवाडेकर, प्रभू पाटील इंगळे आदींची उपस्थिती होती.