
हिमायतनगर। होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशन हिमायतनगरच्या वतीने होमिओपॅथीचे जनक डॉ .सॅम्युअल हनेमन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज दि.१०/०४/२०२३ रोजी जागतिक होमिओपॅथी दिवस व होमिओपॅथीचे जनक डॉ .सॅम्युअल हनेमन यांचा जन्म दिवस होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशन हिमायतनगर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉ.सॅम्युअल हनेमन यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी येथील प्रसिद्ध डॉ.माने सरांचे समायोजीत भाषण झाले. यावेळी त्यांनी डॉ सॅम्युअल हनेमन यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी डॉ. राजेंद्र वानखेडे , डॉ.माने , डॉ.मिराशे , डॉ.ढगे , डॉ.शेवाळकर , डॉ.जाधव , डॉ.शोएब , डॉ.पारवेकर , डॉ.शशिकांत वानखेडे, डॉ. वाघमारे आदींची उपस्थिती होती.

