
कंधार, सचिन मोरे। भाजप मध्ये गेल्यानंतर त्या पक्षात जे शिस्त आहे ते कोणत्याही पक्षात शिस्त नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांसह जनतेसाठी विविध योजना करणारे पहिले पंतप्रधान आहेत. कै. शंकरराव चव्हाण यांच्या घरात पन्नास वर्ष सत्ता असताना देखील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी महामार्गाचा एक किलोमीटर चा रस्ता केला नाही परंतु भाजप च्या सरकारने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड जिल्ह्यात मोठया प्रमाणात मोठा निधी देऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम केले आहे असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
संगुचीवाडी तालुका कंधार येथे जलजीवन मिशन योजेनेअंतर्गत त 1 कोटी 6लक्ष रुपयांचा निधी आणि सिमेंट रोड साठी 7लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्या कामाचे भिमिपूजन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना खा. चिखलीकर म्हणाले कि, निवडणुका आल्या कि अनेक छत्र्या उगवतात आणि निवडणुका गेल्या कि छत्र्या मोडतात तसा प्रकार सध्या कंधार लोहा मतदार संघात चालू आहे. मी तुमच्या जीवावर मोठा झालो आहे तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केल्यामुळे आज तुमच्या मुळे खासदार झालो आहे. तुमचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही, मी निधी देतो म्हणजे माझे काही उपकार नाहीत माझे कर्तव्य मी करीत आहे, तसेच तुमच्या प्रेमामुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पराभूत केलो आहे असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
या कार्यक्रमांस अशोक पाटील मुगावकर ,कंधार नगरपालिकेचे मा. नगराध्यक्ष जफरोदिन बाहोद्दीन, भाजपा ग्रामीण जिल्हाअध्यक्षा चित्राताई गोरे, शिवाजीराव येईलवाड, सुभाष सपुरे ,पांडुरंग कुंभारे माजी जिल्हा परिषेद सदस्य रामचंद्र येईलवाड, कंधार तालुका अभिवक्ता संघांचे माजी अध्यक्ष ऍड. दिगंबर गायकवाड, सुभाष घुमे, मधुकर पाटील डांगे, अनिकेत जाधव,बालाजी तोटावाड, निलेश गौर,व्यंकट नागालवाड चेतन केंद्रे श्रीधर गोरे वीरभद्र राजुरे विठ्ठल पाटील पांगरेकर सुभाषराव कौशल्य पांगरा सुरेश बासटे तेलंगवाडी संगचीवाडी च्या उपसरपंच श्रीमती सखुबाई वारकड शंकराव कोंके अंकुश येईलवाड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच मोठया संख्येने उपस्थित होते.
या बातम्या देखील आपणास आवडतील
- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध कामांसाठी निविदा -NNL
- रस्ता सुरक्षा हे सर्व नागरिकांचे एक कर्तव्य आहे…डॉ. मीनलताई पाटील खतगावकर -NNL
- युवा कार्यकर्ते सचिन खंदारे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व फळाचे वाटप -NNL
- कुठलाही अहंकार नसलेले आमदार म्हणजे मोहनराव हंबर्डे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात भास्करराव पाटील खतगावकरांचे गौरवोद्गार -NNL