
नांदेड। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राम मनोहर लोहिया प्रतिष्ठान विकास मंडळ व नांदेड जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने कला पथकाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या जनजागृती अभियान रथला सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी चौक येथे परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी अभियान मध्ये सहभागी कलाकाराचे स्वागत करण्यात आले.


नांदेड जिल्हा पोलीस दल यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व कला पथक प्रमुख प्रा.विष्णु गोडबोले, संकल्प रथ संयोजक पोलीस हवालदार संतोष सोनसळे, सहायक पोलिस अंमलदार, विशाल शेंडगे ,प्रशांत गजभारे,स्वप्नील सोनकांबळे यांच्या साहाय्याने ६ एप्रिल पासून नांदेड शहरात व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत जनजागृती अभियान रथातून डिजे बंद करू, गरजु होतकरू विधार्थाना कपडे, व वही पेन वाटप करू, व्यसन मुक्तीचा संकल्प करू, शिक्षणाची ओढ निर्माण करू, अफवा होणारे परिणाम टाळु, शांती आणि समतेचा संदेश देऊ या, वाद मुक्त जयंती साजरी करू या, शिका संघटीत वहा, संघर्ष करा हा विचार शांती व समतेने पुढे नेऊया हा संकल्प हा रथ शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक वसाहती व चौकात जनजागृती अभियान करत आहे.


१० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता सिडको येथील शिवाजी चौक भागात या जनजागृती अभियानांतर्गत विष्णु गोडबोले व समुहाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित विविध गिते सादर केले,प्रतिष्ठानचे प्रा.विष्णु गोडबोले यांनी प्रास्ताविकातुन या अभियानाचे महत्त्व सादर केले.


सिडको परिसरातील आयोजित या जनजागृती अभियानाला नांदेड दक्षिण वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, अमृत नंरगलकर, राजु लांडगे, सावते यांच्या सह राजकीय पक्ष व जयंती मंडळ पदाधिकारी, पत्रकार, उपस्थित होते.

सिडको परिसरात हे जनजागृती अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे वाचक शाखेचे बालाजी दंतापले, बि. डी. बिराजदार, सिडको पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे यांनी सहकार्य केले. हे जनजागृती अभियान रमा माता चौक, सिडको, बळीरामपुर येथे ही जनजागृती अभियान जागृती केली.
