
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकुर। माहूर येथील श्री जगदंबा हायस्कुल माहूर सन् १९८७-८८ या तुकडीचे स्नेह संमेलन कपिलेश्वर धर्मशाळा, माहूर येथे दि. ८/४/२०२३ते दि. ९/४/२०२३ ला घेण्यात आले. तब्बल ३५ वर्षानंतर सर्व वर्गमित्र भेटले असता त्यांच्या चेह-यावरील भाव, उत्कटता यांचा अनोखा संगम या वेळी पहावयास मिळाला. दोन्ही दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सुंदर आखणी आयोजकांनी केली होती. जुन्या आठवणींना उजाळा देऊन परिवारासह उपस्थिती दर्शवत एक. -मेकांची सद्यस्थिती जाणून घेत जीवनातील बरे वाईट अनुभवांचे कथन केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जगदंबा हायस्कुलचे निवृत्त तथा जेष्ठ शिक्षक अरुणराव कोरटकर होते तर प्रमुख पाहूणे म्हणून नागोराव गोडसे, केशवराव पोपूलवार, आर. वाय. राठोड, मंगला मुनेश्वर, दवणेसर जगताप सर, मस्के सर, पांडुरंग कांबळे, दामलवार यांची मंचावर उपस्थिती होती. सर्व माजी विद्यार्थ्यातर्फे सर्व गुरुजनांचा यावेळी सादर नमस्कार करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र दत्त वर्मा यांनी करत सर्व मित्र एकत्र आणण्यासाठी मुख्य आयोजक रवी भलगे, जगदीश तुपदाळे, कृष्णा सूर्यवंशी, अजय पोपुलवार, विजय कांबळे यांनी सहकार्य करून कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन करण्यास मदत केल्याचे नमूद केले.


मनोगत तथा स्वागत गीत सौ. जयश्री रणजीत वर्मा (सूर्यवंशी) यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर यावेळी बाल चित्रकार गुंजन वर्मा हिने मैत्रीचे महत्व सांगणारी इंग्रजी व हिंदी भाषेतील सादर केलेली कविता उल्लेखनिय ठरली, यावेळी मान्यवरांनी तिचा विशेष सत्कार केला.माजी विद्यार्थीनी सौ. मीना भास्करवार, सौ कविता चुंगडे यांनी आपल्या प्रिय शिक्षिका मंगला मुनेश्वर यांच्या हाताची छडी घेत छडी लागे छम-छम, विद्या येई घम- घम असे म्हणत आनंदोत्सव साजरा केला.


पुनम व विनोद बेले या गोडजोडीने मनोगताची सुरुवात करून आपल्या भावना प्रकट केल्या ,विश्वनाथ केंद्रे यांनी भावनिक होत आपले मनोगत सादर केले. विजय सुकलकर, अनिल राठोड, दशरथ जयस्वाल, दिनेश कांडलकर यांच्या सह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांनी त्यांच्या विनोदी शैलीने खुमासदार हास्य कल्लोळ निर्माण करत कार्यक्रमात रंगत वाढविली.

दुसऱ्या सत्रात वामन दादा कर्डक संगित अकादमीचे प्राचार्य सुरेश यादवराव पाटील (साम वाहिनीने सादर केलेला ‘अंतरनाद’ संगित कार्यक्रम कलावंत), त्यांच्या भगिनी प्रतिभा पाटील, प्रज्ञाचक्षु कलावंत अनिलकुमार उमरे, प्रा. प्रशांत खाडे, राहूल तामगाडगे, साहेबराव वाढवे यांच्या साथ संगतीने कार्यक्रमाला रंगत आणली यावेळी सलीम खाकरा, मंसुर भाई, इक्बाल भाई, संजय काळीकर, सुनिल देव, खुशाल भगत दिलीप तुपकरी, विद्या चौधरी, अर्चना वाघ, भारत पवार, वंदना कोट्टेवार, रेखा जगताप, चरणसिंग जाधव, सतीश भोपळे, आनंदा कलाने यांनी नृत्याच्या तालावर ठेका धरत नृत्य सादर करण्यास संचलन कर्ते शेषराव पाटील यांनी भाग पाडले. शेवटी कार्यक्रमाचे आभार आयोजक रवी भलगे यांनी मानले.
