
नवीन नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी ९ एप्रिल रोजी अकरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत कर्मचारी विकास पॅनलचे सर्व अकरा जागेवर उमेदवार विजयी झाले आहेत,या पॅनलचे प्रमुख शिवराम लुटे व विजयी उमेदवाराचे समर्थकांनी भव्य सत्कार करून गुलाल उधळून अभिनंदन केले.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दोन पॅनल सह अपक्ष उमेदवार यांच्यात आकरा जागेसाठी २६ उमेदवार मध्ये निवडणूक झाली यात ११ अकरा जागेसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते,या झालेल्या ९ एप्रिल ला सकाळी आठ ते चार दरम्यान मतदान झाले,यात एकूण मतदार संख्या ४५९ पैकी ४४६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला, निवडणूक अधिकारी म्हणून संजय कार्लेकर, मतदान केंद्र अध्यक्ष राजेश चरपिलवार, सहाय्यक अधिकारी स्वाती पटके,रेणुका जाधव यांनी काम बघितले.


सायंकाळी मतमोजणी मध्ये सात वाजता निकाल घोषित करण्यात आला . यात सर्वसाधारान गटातून शिवराम तुकाराम लुटे ३३०,गोविंद दताराम हंबर्डे २६६,हुशारसिंग शंकरसिंग साबळे २६१,तुकाराम व्यंकटी हंबर्डे २२८,संतोष धोंडोपंत खमीतकर २२३,अभय अशोकराव जोशी २५४, महिला मतदारसंघातून ज्योती प्रकाश चितारे २४२, हेमलता प्रभाकरराव पाटील २९९ ,ईतर मागासवर्गीय बालाजी ऊतमराव शिंदे २२१, अनुसूचित जाती जमाती काळबा शंकरराव हनवंते २८७, भटक्या विमुक्त जाती जमाती संजयसिंह गजरासिह ठाकूर २५३मते घेऊन कर्मचारी विकास पॅनलचे उमेदवार एकतर्फी निवडून येऊन पतसंस्थेवर वर्चस्व प्रस्थापित केले, तर विरोध पॅनलला व अपक्ष उमेदवारांना यांना या निवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

