
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने क्रांतिकारी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.


या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. वसंत कदम, डॉ. शेख शहेनाज, डॉ. पवार एल. एस., डॉ. संघपाल इंगळे, डॉ. सय्यद जलिल, डॉ. डी. सी. देशमुख, श्री प्रभू पोराजवार, श्री राहुल भरणे आदींसह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ शिवाजी भदरगे यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

