
उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड जिल्ह्यासह ग्रामीण भागात नावारूपाला आलेली व सर्वसामान्य नागरिकांना वेळप्रसंगी सेवा पुरविणारी संकल्प व वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था यांच्या वतीने १४ एप्रिल २०२३रोजी महामानव , विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात तमाम भीमसैनिकांना अपेक्षा हाॅस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप फुगारे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीनां पाणीवाटपाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष मांगिलाल राठोड यांनी कळविले आहे.


संकल्प व वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था नांदेड , यांच्या वतीने नांदेड ,परभणी हिंगोली ,यवतमाळ या जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध आरोग्य शिबीर कार्यक्रमांतून गरजू लाभार्थ्यांना अनेक लाभ मिळवून दिला आहे. संस्थेचे सचिव मांगिलाल राठोड व त्यांचे सहकारी, कर्मचारी गावागावांत जावून आरोग्य शिबीरे आयोजित करून लाभार्थ्यांचे आरोग्य तपासून व मार्गदर्शन करून मोफत चष्मे वाटप करतात.रुग्णांना अपेक्षा हाॅस्पीटल व अनेक नोंदनियुक्त हाॅस्पिटल मध्ये सहकार्य करताना दिसतात. दि. १४ एप्रिल रोजी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उपस्थितीत भीमसागराची तहान भागविण्यासाठी पाणी वाटपाचे आयोजन केले आहे.


अपेक्षा हाॅस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप फुगारे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत पाणीवाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांना पाणी पाजवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्याचे सार्थक होईल असे मत संस्थेचे सचिव मांगिलाल राठोड यांनी बोलताना व्यक्त केले.

