
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे मंगलवार दि.११ एप्रिल रोजी सेवा सहकारी सोसायटीची पंचवर्षीक निवडणूक पार पडली त्यामध्ये न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पो.पाटील संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष हेमंत गावंडे पाटील यांची चेअरमन तर व्हाईसचेअरमन पदी सौ.ज्योती सुभाषराव डाखोरे यांची बिन विरोध निवड करण्यात आली.


ग्रामपंचायत गोकुळ गोंडेगाव येथील सभागृहात दि,११ रोजी सेवा सहकारी सोसायटी चि निवडणूक घेण्यात आली सर्व प्रथम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. १३ संचालक असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था गोकुळ गोंडेगाव या सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक निवडणूक निर्वाचन अधिकारी एस.ऐम.गाढवे व अशिष वांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.


चेअरमन पदी सायफळ येथील पोलीस पाटिल हेमंत गावंडे तर व्हाईस चेअरमन पदी सौ.ज्योती डाखोरे यांची संचालकातून बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच राम सिडाम, आनमाळ येथील पो.पाटील नरवाडे पाटील,दिनेश गावंडे,देवराव गावंडे,दिगंबर कुटे, नारायण कुटे, गणपत गावंडे,माणिक गावंडे,संदीप राकेश,उत्तम राठोड,गुलाब भगत,अंबादास ताटेवार, पंचफुल हातमोडे,गोकुक येथील पो.पाटील अमोल सोळंके, रुपेश मोरे ,अभिषेक कर्णेवार आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मानकर यांनी तर आभार संदीप राकेश यांनी मानले.


पोलीस पाटलांना सहकार क्षेत्रातील निवडणूक लढविण्यास नुकतिच शाशनाने परवानगी दिल्याने सायफळ येथील पोलीस पाटिल तथा न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पो.पाटील संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष हेमंत गावंडे पाटिल यांनी हि निवडणूक लढवून चेअरमन पदी विराजमान झालेले जिल्ह्यातील पहिले पोलीस पाटिल आहेत
