आंदोलनाचा ४७ वा दिवस; १७ एप्रिल रोजी पुन्हा निदर्शनेचा इशारा
नांदेड। थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या १९६ व्या जयंती दिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,सीटू, अ.भा.जमसं आणि डीवायएफआयच्या वतीने १९६ पुस्तके वाटप करून त्यांच्या स्मृतीस क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.
दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी माकप आणि जनसंघटनाचे उपोषण,धरणे, साखळी उपोषण आणि निदर्शने आंदोलने सुरु आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी दि.२९ मार्च रोजी माकपच्या शिष्ठमंडळासोबत विस्तृत चर्चा करून काही प्रश्न मार्गी लावले आहेत तसेच आठ दिवसात संपूर्ण आढावा घेऊन ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे परंतु काही मागण्या अजूनही अपूर्णच असल्यामुळे आंदोलन थांबण्यास तयार नाही.
माकपचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी यापूर्वीच महात्मा फुले जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करणार असल्याचे घोषित केले होते. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना देखील येथेच अभिवादन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राऊत यांनी दिलेला निर्धारित वेळ संपत असून पुनःच लक्ष वेधण्यासाठी दि.१७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची नोटीस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
या अभिवादन कार्यक्रमामध्ये माकपचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार,कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड,कॉ.श्याम सरोदे,कॉ. जयराज गायकवाड,कॉ.नशीर शेख, कॉ.शुभासचंद्र गजभारे,कॉ सोनाजी कांबळे,गोपीप्रसाद गायकवाड, गंगाधर खुणे, गंगाधर मेडकर, रावसाहेब मेडकर,विजया काचावार, शितल पटणे,अनुराधा लेंडाळे, कांताबाई तारू, बेरूम शेख हूजूर, रेखाबाई गजभारे,केशव सरोदे,बंटी वाघमारे,ओम वाघमारे आदींनी सहभाग नोंदविला आहे.