
नवीन नांदेड। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि बहुजन कल्याण विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नांदेड आणि जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको नवीन नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक समतेचे पर्व कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सामाजिक समतेचे पर्व कार्यक्रमांतर्गत महापुरुषांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत उपेक्षित, कष्टकरी, गरजू लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचे विद्यमाने विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले आहे.


दिनांक 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय सिडको नांदेड येथे “महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य काल आज आणि उद्या” या विषयावर प्रा.डॉ.किरण सगर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले तसेच विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले, याप्रसंगी प्रा.डॉ.किरण सगर यांनी वरील उद्गार काढले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.निरंजन कौर सरदार अध्यक्षस्थानी होत्या,विचार मंचावर श्री. बापू दासरी समाज कल्याण अधिकारी, नांदेड, प्रा.डॉ. दिनेश मोने प्राचार्य श्री.महात्मा बसेश्वर महाविद्यालय, लातूर, प्रा. डॉ. एन. जी. पाटील, समाज कल्याण निरीक्षक श्री. आर. डी सूर्यवंशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शन पर भाषणात प्राध्यापक डॉ. किरण सगर म्हणाले की, महात्मा फुले यांचा कालखंड अत्यंत प्रतिकूल स्वरूपाचा होता तत्कालीन परिस्थितीत सामाजिक समाज सुधारणेची गरज ओळखून समाज सुधारण्याचे कार्य शिक्षणाच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिले आहे.


देशाच्या उन्नतीसाठी शिक्षण हा घटक महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू मानून त्यांनी प्रथम देशामध्ये स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्यांच्या कार्यात सावित्रीबाई फुले यांचेही मोलाचे योगदान राहिले आहे असे मत व्यक्त करून डॉ. किरण सगर पुढे म्हणाले की समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी उन्नतीसाठी उपेक्षित, कष्टकरी, गरजू घटकांना, समूहाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण असल्याचे ओळखून 1848 पुण्यात महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली. वास्तविक पाहता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शाळा काढून शिक्षणाची सुरुवात क्रांतिकारक अशा स्वरूपाची केली आहे आजच्या पिढीने महापुरुषांचे विचार कृतीत आणण्याची काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत प्रा. डॉ. किरण सगर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी समाज कल्याण अधिकारी श्री.बापू दासरी यांनीही मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रा.डॉ.निरंजन कौर यांनी केले यानंतर सामाजिक न्याय विभागा आणि बहुजन कल्याण विभाग यांच्या विद्यमाने विविध स्पर्धांचे जसे निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांचे स्वागत स्नेहल सरोदे या विद्यार्थिनीच्या स्वागत गीताने करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रावसाहेब दोरवे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. दिलीप काठोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाचे समाज कल्याण निरीक्षक श्री. आर. डी. सूर्यवंशी, सौ. माधवी राठोड, के. टी. मोरे, सौ. वडगीर श पी. जी. खानसोळे, विजयकुमार गायकवाड, कैलास राठोड, महेश इंगेवाड तसेच जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रावसाहेब दोरवे, प्रा. डॉ. दिलीप काठोडे, प्रा. डॉ. मनीषा मांजरमकर, प्रा. डॉ. प्रतिभा लोखंडे, प्रा. डॉ. अशोक वलेकर प्रा. डॉ. विद्याधर रेड्डी, प्रा.डॉ. सत्वशीला वरघंटे,प्रा.सुनील राठोड,प्रा.डॉ.शिवाजी शिंदे, प्रा. सुनील गोइनवाड, श्री बी बी.जे. गुंडे, राजेश पाळेकर,संतोष मोरे ,आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
