
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। बहुजनांचे नेते व शेतकऱ्यांचे कैवारी नरसी नगरीचे भूमिपुत्र माणिकराव लोहगावे यांच्या वाढदिवसानिमित्त ,माणिकराव लोहगावे मित्रमंडळाच्या वतीने महादेव मंदिर गंगनबीड व खंडोबा मंदीर नरसी येथे ४०० स्टील थाळी व २०० स्टील ग्लास हे मंदिर समितीस देण्यात आले.


या दोन्ही मंदिरात मोठ्याप्रमाणात भंडारे होत असतात. भावीकांना प्रसाद घेण्यासाठी हिरव्या कागद व सुक्ष्म मेनकापडाचा थर असलेली पात्र दिल्या जाते. दोन्ही देवस्थाने हे जंगल परिसरात असल्याने जनावारेही मोठ्याप्रमाणात या ठिकाणी असतात. भाविक जेवण केलेले पात्र तेथेच टाकतो.व त्या वरवर कागदी दिसणारे पात्र मात्र त्यावर लावण्यात आलेलेला सुक्ष्म मेनकापडा लेअर गरम अन्न पात्रावर टाकल्यानंतर ते माणसाच्या खात असलेल्या अन्नात मिसळून पोटात जातो. माणसे जेवण करूत पात्रासह पात्रावरील शिल्लक अन्न फेकून देतात .


फेकून दिलेले पात्र जनावरे खातात आणी जनावरांचे आरोग्य बिघडते यामुळेच मानव आणी पशुच्या जिवाची काळजी घेणारा पर्यावरणपूरक व आरोग्यदायी उपक्रम राबवून स्टील च्या ४०० प्लेट व स्टिलचे २०० ग्लास हे दोन्ही मंदिरानां भेट देण्यात आल्या. यावेळी श्री क्षेत्र महादेव मंदिर गंगनबीड चे अध्यक्ष – शंकर रघुनाथ जाधव, सचिव- गंगाधर भाऊराव मोरे, पुजारी – उमाकांत गंगाधर स्वामी यावेळी माणिकराव लोहगावे मित्र मंडळाचे संभाजी मिसे , श्यामसुंदर कोकणे ,वैजनाथ लोहगावे, हानमंत माजंरमे , गोविंद मामा तुप्पेकर, सदाशिव माने सर , परमेश्वर लोहगावे, व्यंकटराव भेरे, ज्ञानेश्वर भत्ते सर , प्रकाश मिसे, भत्ते सर , रामेश्वर कोकणे हे होते, तर खंडोबा मंदीर नरसी येथे मंदिर समिती अध्यक्ष माधव मेकाले, मा. अध्यक्ष माधव वडजे, सचिव हानमंत कोकणे, गंगाधर वडगावे मा. तंटामुक्ती अध्यक्ष, मारोतराव मांजरमे, भास्कर कोकणे, पांडूरंग बागडे, दत्ता भरपुरे, दत्ता गागलेगावे, नंदकिशोर कोरे, मारोती दरेगावे,गजानन मुगावे, शिवाजी बडूरे आदीची उपस्थिती होती.

