
नांदेड। अवैद्य शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते.


दिनांक 12/04/2023 रोजी श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्थागूशा नांदेड यांना नांदेड शहरातील अंगद हॉटेलसमोर एक इसम स्वतःचे जवळ पिस्टल बाळगुन असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार याना अंगद हॉटेल, नांदेड येथे रवाना केले. स्थागुशा चे अधिकारी व अमंलदार यांनी अंगद हॉटेलसमोर नांदेड येथे जावुन आरोपी नामे जसपालसिंघ दिवानसिंघ संधु वय 22 वर्ष रा गुरुव्दारा गेट नंबर 6 नांदेड यास पकडुन त्यांची झडती घेतली.


यावेळी त्याचे कमरेला लावलेले एक गावटी बनावटीचे पिस्टल किंमती 18000/- रुपयाचे मिळुन आल्याने ते जप्त केले असुन नमुद आरोपीचा हा पोलीस ठाणे भाग्यनगर गुरनं. 100 / 2023 कलम 395,506 भा द वि सहकलम 3/25,4/25 शस्त्र अधिनियम गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील तपासकामी पो स्टे भाग्यनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.


सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि/ दत्तात्रय काळे, गोविंद मुंडे, जसवंतसिंघ शाहु पोहेकॉ / सखाराम नवघरे, रुपेश दासरवार, शंकर म्हैसनवाड, पोना / दिपक पवार, पद्मसिंह कांबळे, पोकॉ/ बालाजी यादगीरवाड, चापोकॉ/ गंगाधर घुगे, शंकर केंद्रे व सायबरचे राजु सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
