
नांदेड। दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील एका कर्मचाऱ्याला महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार देवून श्री अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक यांनी सन्मानित केले. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अरुण कुमार जैन यांच्या हस्ते नांदेड विभागातील श्री दगडू बालाजीं, चावी वाला/पिंगळी यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.


दक्षिण मध्य रेल्वे स्थरावर फेब्रुवारी – 2023 या कालावधीत त्यांच्या कर्तव्याची दक्षता, अनुचित घटना रोखण्यात आणि रेल्वे संचालनात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांचे योगदान यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये एक पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्यासाठी प्रशस्तीपत्र आणि रोख रकमेचे पारितोषिक आहे.


दिनांक 4 फेब्रुवारी, 2023 रोजी आपले कर्तव्य बजावत असताना श्री दगडू बालाजीं यांना पिंगळी यार्ड येथे किलोमीटर 300/6-7 येथे 06:30 वाजता रेल्वे रूळ तुटल्याचे आढळले. त्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.


यामुळे त्यांना महाव्यवस्थापक यांचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. श्रीमती नीति सरकार, विभागीय व्यवस्थापक, नांदेड यांनी श्री दगडू बालाजी , चावी वाला यांना नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात महाव्यवस्थापक यांचा पुरस्कार देवून गौरविले.
