Tuesday, June 6, 2023
Home क्राईम धर्माबाद हद्दीत जबरी चोरी करणारे चार आरोपी ताब्यात, 8 78,000/- रुपयाचे सोन्या-चांदीचे दागीने जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही -NNL

धर्माबाद हद्दीत जबरी चोरी करणारे चार आरोपी ताब्यात, 8 78,000/- रुपयाचे सोन्या-चांदीचे दागीने जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड। पोलीस ठाणे धर्माबाद हद्दीत करखेली ते कारेगाव जाणारे रोडवर विळेगाव शिवारात दिनांक 10/04/2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास अनोळखी चार चोरटयांनी दोन मोटार सायकलवर येवुन इसम नामे अजित वंसत माने वय 33 वर्ष रा. कारेगाव ता धर्माबाद यास आडवुन त्याचेकडील 86 ग्राम सोन्याचे दागीने व 08 किलो चांदीचे दागीने असे एकुण 11,03,650/- रुपयेचा माल खजरवा धाक दाखवुन जबरीने चोरुन नेले होते. वगैरे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे धर्माबाद गुरनं. 72/2023 कलम 394, 34भा द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

दिनांक 12/04/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारे आरोपी विसावा पार्क हसापुर रोड, नांदेड येथे बसलेले आहेत वगैरे माहीती मिळालेने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने विसावा पार्क हसापुर रोड, नांदेड येथे जावुन सापळा रचुन आरोपी नामे 1) निखील सुरेश कुटूंरवार वय 20 वर्ष रा बसवेश्वर नगर, कौठा नांदेड 2 ) वैभव शरद जाधव वय 20 वर्ष रा नरोबा मंदीर कौठा, नांदेड 3) अनिल मोहन कोतवाल वय 20 वर्ष रा नरोबा मंदीरजवळ कोठा नांदेड 4) एक विधीसंघर्षीत बालक यांना विचारपुस केली असता, त्यांनी पोलीस ठाणे धर्माबाद गुरनं. 72/2023 कलम 394,34 भा. द. वि. हा गुन्हा केल्याचे सांगीतले आहे.

वरील आरोपी क्रं. 1 ते 3 यांचेकडुन गुन्हयातील गेले मालापैकी 86 ग्राम सोन्याचे दागीने किंमती 4,98,000/- व 05 किलो चांदीचे दागीने किंमती 3,50,000/- रुपये व तिन ॲण्डरॉईल मोबाईल किंमती 30,000/- रुपये असा एकुण 8,78,000/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांना पुढील तपासकामी पो स्टे धर्माबाद यांचकडे देण्यात आले आहे. नमुद आरोपीताकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.. तसेच सदर गुन्हयात दिनांक 11/04/2023 रोजी पोलीस ठाणे धर्माबाद पोलीस पथकानी आरोपी नामे बालाजी पिराजी पल्लेवाड ऊर्फ पकाल वय 25 वर्ष रा गोळेगाव ता उमरी जि नांदेड यास अटक करुन तपास चालु आहे.

सदर आरोपी पिसीआर मध्ये असुन उर्वरीत मुद्येमालाबाबत त्याचेकडे तपास करणे चालु आहे. सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर, पो. नि. स्थागूशा नांदेड सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि /सचिन सोनवणे, सपोउपनि / माधव केंद्रे, पोहेकॉ / गंगाधर कदम, पोकॉ/ देवा चव्हाण, मोतीराम पवा तानाजी येळगे, मारोती मोरे, चालक अर्जुन शिंदे, गंगाधर घुगे, शेख कलीम स्थागुशा, नांदेड व पोलीस ठाणे धर्माबाद येथील पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, सपोनि/शिवप्रसाद कत्ते, सपोउपनि / मनोज मसलेकर, सुदाम आडे, सयद गौसोधीन, पोहेकॉ / बालाजी नागमवा पोकॉ/ बद्रीनाथ इंजेपवाड, चालक पोह/गोविंद पवार, दत्तात्रय गुरुपवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नां यांनी कौतुक केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!