
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। जिनियस किड्स ईन्टरनॅशनल इंग्लिश स्कूल माहूर च्या विद्यार्थीने घवघवीत यशाची परंपरा कायम ठेवत आरटीएसई कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत कू.नियती विक्रम राठोड या विद्यार्थीनीने राज्यात पहिला क्र.पटकाविला आहे.


सह्याद्रि नंगर येथे राहणारी कु.नियती हि नर्सरी पासून जिनियस किड्स ईन्टरनॅशनल इंग्लिश स्कूल ची विद्यार्थीनी आहे, फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या आर.टि.एस.ई. चि परीक्षा तिने दिली होती एप्रिल मध्ये त्याचा निकाल लागला असून ६ व्या वर्गात शिकत असलेली कू.नियती राठोड या विद्यार्थिनीने १७६ गुण घेऊन राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. संस्थेचे संचालक भाग्यवान भवरे सचिव सौ.शितल भवरे तसेच शाळेचे मुख्याध्याक सुधिर गौरखेडे. व सर्व शिक्षकांनी तिचा सत्कार करून कौतुक केले आहे.


आटीएसई २०२३ या परीक्षेची पूर्व तयारी शाळेतील शिक्षक प्रफुल्ल भवरे, वर्ग शिक्षक आकाश राठोड,सोहील खॉन, यांनी विशेष मार्गदर्शन केले. कू.नियतिने आपल्या यशाचे श्रेय वडील विक्रम आई सौ.वैशाली व सर्व मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिनियस किड्स ईन्टरनॅशनल इंग्लिश स्कूल, च्या या शाळेने विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सहभागी करून घवघवीत यशाची विद्यार्थ्यांना परंपरा कायम ठेवत ही संस्था नावारूपास येत आहे.

