
लोहा| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी आ शंकर अण्णा धोंडगे याना खूप काही दिले आमदार केले तरी त्यांनी पक्ष सोडला. पण येत्या काळात आपला पक्ष अधिक बळकट होईल बूथ कमिटी प्रबळ करावी. देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या विचारातील हा पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारा पक्ष आहे. सर्वांनी संघटनात्मक पातळीवर चांगले काम करावे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर वन क्रमांकावर असेल असं मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी केले.


लोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेल व बुथ कमिटीची बैठक जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र येईलवाड, सरचिटणीस डी.बी.जांभरुनकर, बुथ कमिटीचे उतर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख, बुथ कमिटीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष गजानन पांपटवार,युवा नेते शिवकुमार भोसीकर बैठकीचे आयोजक माजी नगरसेवक रमेश माळी होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, शहराध्यक्ष प्रभाकर पाटील पवार, विलास पाटील घोरबांड, विश्वाभंर भोसीकर, बंटी सावंत शरद जोशी, तानाजी वड, दिगांबंर सोनवळे, राष्ट्रवादी चे नेते डॉ. उतमराव सोनकांबळे,दिगाबंर गवळे,मारोती कांबळे, अजिश कुरेशी, लतीफ शेख, आदी उपस्थित होते.


हरिहर भोसीकर म्हणाले की. बुथ कमिटीची बैठक संपुर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे असे आदेश पक्षाने दिले आणि ही बैठक होते आहे. आता लवकरच तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्कल अध्यक्ष,बुथ कमिटीचे अध्यक्ष यांच्या निवडी करण्यात येतील. माजी आ. शंकर अण्णा धोंडगे यांना पक्षाने तिकीट दिले आमदार केले, शाळा दिल्या, त्यांच्या मुलाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले पण ते पक्ष सोडून बीआरएस मध्ये गेले केसीआर यांचं कुठ शेतकऱ्यांचे सरकार खर आहे शेतकऱ्यांचे सरकार हे राष्ट्रवादीचे आहे , देशाचे नेते शरदचंद्र पवार हे शेतकरी व शेती याचे हित जोपासणारे नेतृत्व आहे पक्ष बळकट करावा असे संपूर्ण ताकद आपल्या सोबत आहे असे भोसीकर यांनी मार्गदर्शन केले. आयोजक माजी नगरसेवक रमेश माळी यांनी लोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवू. असे नमूद केले. रामचंद्र येईलवाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर पाटील पवार यांनी केले. यावेळी बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

