
नांदेड| फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी जलसा २०२३ चे आयोजन नांदेड येथील तक्षशीला बुद्धविहार मैदान, भागीरथ नगर, जंगमवाडी येथील प्रांगणावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.


फुले शाहू आंबेडकरी जलसा या कार्यक्रमात महिला शाहीर सीमा पाटील यांच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 12 एप्रिल 2023 रोजी फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार या विषयावर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवाद आयोजन करण्यात आले आहे. तर तक्षशीला बुद्ध विहार मैदान, भागीरथ नगर, जंगमवाडी नांदेड येथील प्रांगणावर सुप्रसिद्ध गायक मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, कुणाल वराळे, गौरव जाधव हे आंबेडकरी जलसा सादर करणार आहेत.


शाहिर संतोष साळुंखे व सहकलाकार राजर्षी शाहू महाराज यांच्यावर आधारित शाहिरी पोवाडा सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कलाकाराच्या कलापथकाचा, शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाचा नांदेडच्या कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य बिभीषण चवरे यांनी केले आहे.

