
उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड पोलीस व क्लिक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उस्माननगर पोलिस स्टेशन हद्दीतील प्रमुख गावा गावातील मुख्य ठिकाणी सायबर सुरक्षा रथाचे स्वागत करून कलाकारांनी सायबर गुन्हेगारी विषयी नाटीका सादरीकरण करून जनजागृती केली.यावेळी नागरिकांनी ऐकण्यासाठी व पाहाण्यासाठी गर्दी केली होती.


अलीकडच्या काळात ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सायबर गुन्हे घडवून जनतेची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहेत सदरच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहार तसेच सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत जनतेमध्ये सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी माननीय श्री डॉक्टर शशिकांत महावरकर पोलीस उप महानिरीक्षक नांदेड ,परिक्षेत्र नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या संकल्पनेतून क्विक हिल फाउंडेशन व नांदेड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा रथ तयार करण्यात आला .


पोलीस उपनिरीक्षक शशिकांत महावरकर यांच्या हस्ते रथाचे उद्घाटन करण्यात आले. हा रथ नांदेड जिल्ह्यातील ३६ पोलीस स्टेशन अंतर्गत शाळा कॉलेज महाविद्यालय व गर्दीच्या ठिकाणी असे एकूण १२८ ठिकाणी जाऊन जनतेमध्ये सायबर गुन्हे विषयी जनजागृती करणार आहेत यांचाच एक भाग म्हणून उस्माननगर तालुका कंधार येथील बसस्थानक येथे दिनांक ११ एप्रिल २०२३रोज मंगळवार ह्यादिवशी नांदेड पोलीस व क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हे विषयी जनजागृती करण्यात आले यामध्ये जनजागृती द्वारा मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे परिणाम, सोशल मीडिया व ऑनलाइन पेमेंट ॲप वापरताना कोण कोणती खबरदारी घ्यावी व आपली ऑनलाइन फसवणूक होणार नाही याबाबत कशाप्रकारे काळजी घ्यावी तसेच ऑनलाईन सायबर क्राईम कशा प्रकारे होतात जसे की सोशल मीडियाचे प्रोफाइल लॉक न केल्याने आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी दिल्याने कोणत्याही अनोळखी लिंक ला क्लिक करून त्यावर आपले बँक खात्यांची माहिती दिल्याने कशाप्रकारे फसवणूक होते याबाबत पथनाट्य सादर करून सायबर जनजागृती करण्यात आली.


सायबर जनजागृती पथनाट्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन नांदेडचे काशिनाथ कारखेडे ,क्विकहिल फाउंडेशन तर्फे आधार सामाजिक संस्था सातारा या पथनाट्य पथकातील कलाकारसुनिल नलावडे,मल्हारी जाधव,राजेंद्र मोरे ,ऋत्विक रांसे,सुयश बाबर,किरण घोदे,गणेश महाजन, आनंद भगत इत्यादी कलाकारांनी सायबर गुन्याविषयी पथनाट्यातून जनतेला माहीती दिली यावेळी उस्माननगर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.पी.डी.भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, पोलीस कर्मचारी अनिरूद्ध वाडे, यांची प्रमुख उपस्थितीती होती. यावेळी पोलीसपाटील विश्वाभंर मोरे, गृहरक्षक दलाचे प्रमुख सलीम शेख,कांता सोनसळे, पत्रकार माणिक भिसे,व गावातील नागरीक व मुल मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
