
नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जवळपास दोन हजार मोकळे भूखंड असुन संबधित मालमत्ता धारकांनी अद्यापही मालमत्ता कर न भरल्याने तात्काळ मालमत्ता भरून मनपा प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा भूखंड जप्ती कार्यवाही करण्याचा ईशारा सिडको येथे मालमत्ता करा संदर्भात झालेल्या बैठकीत उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी कर निरीक्षक व वसुली लिपीक यांना दिली.


नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे ११ एप्रिल रोजी मालमत्ता कर थकीत वसुली आढावा या बाबत बैठक घेण्यात आली, यावेळी सहाय्यक आयुक्त सदाशिव पंतगे,सिडको क्षेत्रीय कार्यालय डॉ. रईसोधदीन, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक सुधीर बैस, सुदास थोरात यांच्या सह वसुली लिपीक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.


मार्च ३१ अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय यांनी दिलेल्या ऊदीष्ट पुरती करून वसुली करण्यास सहकार्य करणार्या कर निरीक्षक,वसुली कर्मचारी यांच्ये अभिनंदन केले, गेल्या अनेक वर्षांपासून क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या जवळपास दोन हजार मोकळया भूखंड मालमत्ता धारकांनी गेल्या अनेक वर्षे पासून मालमत्ता कर न भरल्याने ही रक्कम पाच कोटी रुपयांचा वर गेल्याने मालमत्ता थकीत रक्कम मध्ये वाढ झाली आहे, या बाबत संबंधित मालमत्ता धारकांना वसुली लिपीक यांच्या मार्फत मालमत्ता कर भरण्यासाठी नोटीस बजावुन मालमत्ता करासाठी वसुली लिपीक यांनी भेट घ्यावी. जे भुखंडधारक मालमत्ता कर भरण्यासाठी टाळाटाळ करीत असतील अशा विरूद्ध जप्ती कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या असून लवकरच संबधीतांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले असून मनपाच्या सहाही क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मोकळया भूखंड धारका विरुद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

