
हदगाव, शे चादपाशा| आम्ही राजकारणी असलो तरी सरकार मधील आपल्या संबधाचा हदगाव विधानसभा क्षेञाच्या सर्व सामन्य जनतेला कसा फायदा होईल याकडे माझ लक्ष केद्रीत असुन, मला ‘शो’ करायच नाही. प्रत्यक्षात काम करायच आहे. असे प्रतिपादन हदगाव विधानसभा क्षेञातील लोकनेते बाबुराव कदम (कोहळीकर) यांनी केले. ते शहरातील माहेश्वरी भवनात दि ३० एप्रिल बुधवारी शहरात भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिराच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.


कार्यक्रमाचे प्रस्ताविक संभाराव लाडगे यांनी केल. ते पुढे म्हणाले की, आजच्या जीवनशैली मध्ये सर्वसामान्य जनतेला अनेक गंभीर आजाराशी सामना करावा लागत आहे. जेव्हा आजाराचे निदान करतांना अखेरच्या टप्प्यात रुग्णाचे नातेवाईक जेव्हा संपर्क करतात तेव्हा फार अडचणी निर्माण होतात. यामुळे मुंबई पुणेच्या हास्पीटल प्रशासनाशी निदान केलेल्या डाँक्टरच्या बीला संबधी तडजोड करावी लागत आहे. या करिता वेळीच शिबीराच्या माध्यमातून जनतेने फायदा घ्यावा असे अहवानही त्यांनी केली.


इतकेच नव्हे तर हदगाव व हिमायनगर तालुक्यातील सुसक्षित बेकार युवकांकरिता विविध कंपन्याशी संपर्क साधलेला आहे. अनेक कंपन्यानी आमच्या विनंतीला प्रतिसाद दिलेले आहे. तसेच महीला बचत गटाना पण विविध बँकेशी संपर्क साधालेला आहे. त्या गरजु बचत गटाना सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे अशी माहीती त्यानी यावेळी दिली.


तज्ञ डाँक्टर उपलब्ध होणार…
दि.३० एप्रिल रोजी होणा-या सर्वरोग निदान व उपचार शिबिरात प्रामुख्याने स्ञी रोग, कर्क रोग, कान व घसा त्वचारोग, अस्थिरोग श्वासन हे तज्ञ डाँक्टर येणार असल्याची माहीती आदर्श विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिदे यानी दिली. यावेळी गोपाल सारडा, पी.के. कदम, आशोकराव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीचे सुञसंचालन सुदर्शन पाटील मणूलेकर यांनी केले.