
काॅग्रेसचे नेते संजय लोणे यांचे निधन -NNL

अर्धापूर। तालुक्यातील लोणी (बु) येथील सरपंच,निवृतीराव लोणे संस्येचे अध्यक्ष,कृऊबा समीतीचे संचालक,तपोवन परिसरात धम्मपरिषदेचे मुख्य आयोजक संजय लोणे यांचे बुधवारी सकाळी छत्रपती संभाजी नगरच्या खाजगी दवाखान्यात निधन झाले,त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्वतंत्रसैनानी कै.आबासाहेब लहानकर तपोवन बुध्दभुमी परीसरात दरवर्षी धम्मपरिषदेचे यशस्वी संजय लोणे आयोजन करीत आहेत, त्यामुळे देशविदेशातील भिख्खू संघ लोणे यांना मानत होते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे लोणे खंदे समर्थक होते, त्यामुळे राजकीय आशीर्वादाने तपोवन ला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून घेऊन लाखोंचा विकास निधी पारदर्शकपणे खर्च करुन परीसराचा विकास साधला,दहा वर्षं कृऊबासचे संचालक,दोनदा सरपंच,व संस्थानिक म्हणून यशस्वी काम केले,साधी राहणी व सर्वासोबत मिळून रहाणे हे त्यांच्या यशाचे गमक होते.
१४ फेब्रुवारी ला त्यांच्या बहिणीचे निधन झाले होते, तेव्हापासून ते बिमार होते, छत्रपती संभाजी नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, अशोकराव चव्हाण यांनी उपचारादरम्यान डॉक्टरांना तब्येतीची विचारपूस केली होती, गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले,या वृत्तामुळे अर्धापूर तालुक्यात शोककळा पसरली तर लोणी येथे सर्व दुकाने बंद ठेवली होती.
त्यांच्या पार्थिवावर १३ एप्रिलला गुरुवारी सकाळी १० :३० वा.लोणी (बु) अंत्यसंसार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई,भाऊ, पत्नी,३ मुली,१ मुलगा असा परिवार आहे, दलीत मित्र कै.निवृतीराव लोणे यांचे ते चिरंजीव तर राजेश लोणे यांचे ते बंधू होते.