
नांदेड। ग्रामीण विकासाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्रिसदस्यीय पंचायतराज व्यवस्थेचे महत्त्व आणि जबाबदारी या विषयावर नांदेड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांची मुलाखत नांदेड आकाशवाणी केंद्रावरून आज 14 एप्रिल आणि उद्या 15 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी प्रसारित होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.


नांदेडच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विकासाच्या वाटेवर हा विशेष कार्यक्रम नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केला जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती या सदरातून दिली जात आहे. या सदरात डॉ. सुधीर ठोंबरे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.


पंचायतराज व्यवस्था, महत्त्व, जबाबदारी व ग्रामविकासाच्या योजनेसह विविध विषयाची माहिती त्यांनी या मुलाखती मधून दिली आहे. तरी ही मुलाखत सर्वांनी ऐकावी असे आवाहन नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी विश्वास वाघमारे यांनी केले आहे.

