
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यातील लिंबायत/नेर सेवा सहकारी सोसायटीची पंचवर्षीक निवडणूक गुरुवार दि. १३ एप्रिल रोजी सहायक निबंधक सहकारी संस्था च्या कार्यालयात पार पडली त्यामध्ये रंजीत लक्ष्मनसिंह चुंगडे यांची चेअरमन तर व्हाईस चेअरमन पदी जयकांत आनंदराव मोरे यांची बिन विरोध निवड करण्यात आली.


१३ संचालक असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक निवडणूक निर्वाचन अधिकारी डि.एच.नगराळे मॅडम सचीव एस.बि. वांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन चेअरमन पदी चुंगडे तर व्हाईस चेअरमन पदी मोरे यांची संचालकातून बिनविरोध निवड करण्यात आली.


यावेळी दिलेरसिंह चुंगडे,धिरज धनावत,रामहारी जाधव, नरेंद्र चुंगडे, विलास जगताप,सौ.रेखाबाई ताटू .शे.रजियाबी गफार.रीतेश चुंगडे. आनंद चुंगडे जनार्धन लोढे.हे उपस्थित होते या निवडी बद्दल मनोहर सिंह चुंगडे .जगदिश पेढवाल.सुरेश पाटिल .राज ठाकूर अदिनी अभिनंदन केले

