
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव न्यायलायामध्ये अभिवक्ता संघा च्या वतीने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी नायगाव न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. लोळगे , अध्यक्ष ॲड.निलेश देशपांडे, ॲड.लंगडापुरे, ॲड. वाघमारे, ॲड. कवळे, ॲड. तुमेदवार, ॲड. पवळे, ॲड. कुलकर्णी व कर्मचारी ईत्यादी उपस्थिती होते.


ग्राम पंचायत कार्यालय मेळगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील सन्माननीय जेष्ठ नागरिक व ग्रामपंचायतचे सरपंच मोहन नागोराव धसाडे, व उपसरपंच प्रतिनिधी मारोतराव पाटील शिंदे, ग्रामपंचायत सदस्य माधव बालाजी शिंदे ,बळवंतराव पाटील शिंदे ,विलास महिपाळे , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बोनागिरे सर, साहेबराव धसाडे ( पत्रकार )अंगणवाडी कार्यकर्ते डी एस भरांडे ,व मदतनीस कविता सूर्यवंशी, व ग्रामपंचायतचे सेवक संजय कंदरवाड ,रोकडेश्वर शिंदे, व या प्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बोलागिरी सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर विचार व्यक्त केले,व गावातील सर्व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.


जि.प.प्रा.शाळा हिप्परगा जा. येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी दोन तास वाचन करून केली साजरी करण्यात आली. जि.प.प्रा.शा. हिप्परगा (जा) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून शिक्षकासह विद्यार्थ्यांनी तब्बल दोन तास वाचन व अभिवादन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी शिक्षकांनी विद्यार्थ्यां समोर मांडली यावेळी मुख्याध्यापक श्री माधव वटपलवाड, सहशिक्षक श्री यमलवाड सर, श्री गायकवाड सर, श्री पचलिंग सर व सौ.शिंगडे मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


नगर पंचायत नायगाव येथे डॉ बाबासाहेबांना अभिवादन…….नगरपंचायत नायगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या निमित्त नव्याने रूजू झालेल्या प्रभारी मुख्याधिकारी श्रीमती देवयानी मॅडम, कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव. नगराध्यक्षा सौ.मिनाताई सुरेश पाटील कल्याण, गटनेते सुधाकर पाटील शिंदे, नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, विठ्ठल बेळगे.दयानंद भालेराव, नगरसेवक प्रतिनिधी नारायण जाधव, रविद्र भालेराव, शरद भालेराव, रामेश्वर बापुले, श्रीधर कोलमवार, भगवान पाटोदे, गोपाळ नाईक, संभाजी भालेराव.मुन्ना मंगरुळे.गणेश चव्हाण. अजय सुर्यवंशी, श्रीकांत शिरोळे.शेख मौला.श्रीकांत वडगावकर. धनराज वरणे.बालाजी बोईनवाड.ज्ञानेश्वर वडगावकर. प्रविण भालेराव.मारोती गायकवाड.संगिंता सरोदे ईत्यादी उपस्थिती होते.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गजानन पा. चव्हाण यांच्या कार्यालय येथे मोठ्या उत्साहाने दि 14 / 04 / 2023 रोजी करण्यात आली. नायगाव शहरातील गजानन पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे नायगाव तालुक्यातील सामाजिक, राजकीय, व विविध क्षेत्रातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या जयंतीस प्रमुख उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, माधव पाटील गंगनबिडकर, चंद्रकांत पाटील पवार .कैलास भाऊ भालेराव.विठ्ठल पाटील गवळी. रामदास पाटील भाकरे. गंगाधर कोतेवार. गजानन पाटील तंमलुरे. पत्रकार हनुमंत चंदनकर. शिवाजी पाटील जाधव सातेगावकर. आकाश पाटील पवार .विठ्ठल वाघमारे बोरीकर. सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरदचंद्र महाविद्यालय नायगाव बा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू, उपप्राचार्य डॉ. शाम पाटील,जेष्ठ प्राध्यापक डॉ. शंकर गड्डमवार, आयक्यूएसी चे समन्वयक प्रा. अमितकुमार पांडे, प्रशासकीय कर्मचारी देविदास भाकरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
महावितरण कार्यालयात भीम जयंती साजरी…..!
नायगाव येथील महावितरण कार्यालयातील सर्व कर्मचारी बांधव यांच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यंकटराव कौठकर, विकास हाड्रे, मधुकर बोडके, गंजेवार, प्रमोद चिवळे, निर्गन वरणे, देविदास आळंदीकर, संतोष सुर्यवंशी.शेख साजिद.ईत्यादी उपस्थित होते.