
नांदेड। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती तरोडा बुद्रुक येथील विकास नगर येथे साजरी करण्यात आली.


शांताबाई औराळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सोसायटीचे चेअरमन डॉ. श्याम दवणे, सचिव परमेश्वर दिपके, शीलाताई तारू, रोहिदास कांबळे, डॉ. प्रकाश मोगले, शाम हटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी शांताबाई औराळकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी त्रिशरण, पंचशील व इतर गाथांचे पठण निला भद्रे, सुखेशनीक्षजिवाळे, प्रतिमा मोगले यांनी केले. याप्रसंगी डॉ. शाम दवणे, परमेश्वर दिपके, डॉ. रामदिनवार, शांताबाई औराळकर यांच्यासह बालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सोनाळे यांनी केले. या कार्यक्रमाला जयंती मंडळाचे पाटलीपुत्र डोंगरे, बालाजी पवार, पंचशीला हटकर, पांडुरंग तारू, प्रल्हाद हनुमंते, सुनीता डोंगरे, प्रतीक्षा दवणे, गयाबाई पांडागळे, वैशाली कांबळे, सविता हनुमंते, मयुरी व्यवहारे यांच्यासह नगरातील बालक, महिला व पुरुष या़ची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

