
उस्माननगर। उस्माननगर येथील शेतकरी परमेश्र्वर वैजनाथ पाटील घोरबांड यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पिक कर्ज नियमितपणे परतफेड वेळेवर केल्यामुळे जिल्हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने जिल्हास्तरावर सत्कार करण्यात आला.


महाराष्ट्र ग्रामीण बँक जिल्हा नांदेड च्या वतीने १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने सन्मान बळीराजाचा वित्तीय साक्षरताअभियाना अंतर्गत पीक कर्ज नियमितपणे नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांचे विभागीय व्यवस्थापक एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान व सत्कार करण्याचे अभियान संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात आले होते.


या निमित्ताने कंधार तालुक्यातील उस्माननगर ता.कंधार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वर पाटील यांनी वेळेवर परतफेड करून बॅंकेस सहकार्य करणारे येथील शेतकरी परमेश्र्वर घोरबांड यांचा सत्कार हाॅटेल बजाज रेसिडेन्सी छत्रपती शिवाजी चौक नांदेड येथे संपन्न झाला. यावेळी क्षेत्रीय व्यवस्थापक निखिल नाफडे, जिल्हा एल. डी. एम अनिल गचके आदींच्या हस्ते १४ एप्रिल रोजी उस्माननगर ता.कंधार परिसरातील पीक कर्ज नियमित नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आला .


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामीण बँक २०२३-२४ या वर्षाचे १००/ पीक कर्ज नूतनीकरणाच्या कामाला वेग यावयास त्यासाठी सर्वत्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून १४ एप्रिल शुक्रवारी सकाळी कंधार तालुक्यातील उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण शाखा अंतर्गत शेतकऱ्यांचा सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उस्माननगर शाखा व्यवस्थापक वैभव मसरे, रोखपाल श्रीकांत भूरेवाड, संजय घोरबांड सह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
