
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालया मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर कार्यकमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कि. के. कदम यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व प्रमुख पाहुण्याची ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. उज्वला सदावर्त मॅडम म्हणून लाभल्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. संजय कसाब( मराठी विभाग) स्वतंत्र सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा जिल्हा परभणी येथील लाभले तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ.गजानन दगडे सर हे लाभले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या भाषणा मधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपट सांगितला. महाविद्यालयातील निलेश चटणे या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी एक प्रसंग आपल्या भाषणामध्ये सांगितला की शिका संघर्ष करा व संघटित व्हा यावरती उत्तम उदाहरण दिले. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती तसेच रमाई वरती कवितेतून मला पुस्तक व्हायचं अशा शब्दातून आपल्या भावना व्यक्त केल्या.


त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय पवार सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढली त्याच प्रमाणे त्यांनी सुरुवातीला आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांना संबोधले गेले.त्यांनी आपल्या भाषणातून मोबाईल वेडे होण्यापेक्षा पुस्तक वाचून वेडे व्हावे असे सांगितले.

अध्यक्षीय समारोपामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवना वरती प्रकाश टाकला की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्तिमत्व होते की आज आपण त्यांच्यामुळेच इथपर्यंत आलो आहेत.असे आपल्या भाषणातून सांगितले.

प्राचार्य मॅडम यांनी आपल्या एकपात्री अभिनयातून नवीन पिढीसाठी आंबेडकरा विषयी अंतर्मुख , विचार करणारा आपल्या राष्ट्र हितासाठी आपल्या अभिनयातून तिरंगा झेंड्याचे महत्त्व पटवून दिले.भारदार एकपात्री अभिनय सादर केला. कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी वडटवार कला द्वितीय वर्ष यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी बनसोडे कला दुतीय वर्ष यानी केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन समाजशास्त्र विभागाद्वारे डॉ. के कदम व डॉ. विश्वनाथ कदम यांनी केले.
