नवीन नांदेड। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त भारतीयांना आदर्श जीवनमूल्य दिलेली आहेत. या जीवन मूल्यांचा आचरणामध्ये अंगीकार केल्यास प्रत्येकाला प्रगतीचा मार्ग सापडू शकतो असा विश्वास प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी व्यक्त केला. वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी येथे १३२ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार बोलत होते.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.व्ही.आर.राठोड , डॉ. शेटे एस. व्ही.प्रा.संतोष शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी डॉ. नागेश कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रात योगदान या विषयावर सविस्तर असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा या मूलमंत्रानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी चाललं पाहिजे अशी भावना डॉ.व्ही आर राठोड यांनी व्यक्त केली. प्रा. शेटे एस. व्ही. प्रा. संतोष शिंदे व डॉ.जी.वेणुगोपाल
यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्ही एम देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. साहेबराव शिंदे यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही.आर.राठोड, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्ही. एन. देशमुख, डॉ. जी वेणुगोपाल, कार्यालयीन अधीक्षक आर.डी. राठोड,डॉ.व्यंकटेश देशमुख ,डॉ.आर.एम.कागणे, डॉ. नागेश कांबळे, डॉ. साहेबराव शिंदे,डॉ. संजय गिरे, डॉ.संजय पालीमकर, डॉ.अनिल गच्चे ,डॉ गणेश लिंगमपल्ले डॉ.साहेबराव मोरे, प्रा.पाटील, प्रा. देवकते, प्रा.पी.बी.चव्हाण, प्रा. कोतवाल,प्रा.झांबरे, प्रा.शेख, डॉ. नागोराव कांबळे, डॉ. लालबा खरात, प्रा. नितीन मुंडलोड, प्रा.शशिकांत हाटकर, प्रा. शुभम कोकुलवार,कांबळे मामा, बालु मामा, रमेश मामा, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.