
नवीन नांदेड। छत्रपती शिवाजी महाराज बहुऊधदेशीय सेवा संस्था धार संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्राच्या वतीने सिडको येथे ९४ सभासदांना गहू, तांदूळचे वाटप १६ एप्रिल रोजी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


छत्रपती शिवाजी महाराज बहुऊधदेशीय संस्था धार संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र संचलित अध्यक्ष बाबासाहेब सुतारे,मराठवाडा अध्यक्ष भिमराव घोगरे व जनसंपर्क अधिकारी दता दुदंबे यांनी प्रत्येकी सभासदांना गहू, तांदूळ मिळाल्या नंतर १६ एप्रिल रोजी वाटप केले.


प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला विमलबाई भरकड, तारूबाई, स्वाती निलावार,रेशमा जानराव, मालती पांडे यांनी पुष्पहार अर्पण केल्या नंतर सभासदांना महिलांना नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर , पत्रकार तिरूपती पाटील घोगरे यांच्या हस्ते गहू तांदूळ वाटप करण्यात आले. यावेळी शादुल बेग, वैजनाथ माने, राहुल गवारे, यांच्या सह सभासद बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

