
अर्धापूर। तालुक्यातील लोणी (खु) येथील काॅग्रेसचे कार्यकर्ते सरपंच,कृऊबा समीतीचे संचालक तथा संस्थाचालक कै.संजय लोणे यांचे बुधवारी निधन झाले, त्यांच्या कुटुंबीयांचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी शनिवारी भेट देऊन सांत्वन केले.याप्रसंगी अशोकराव चव्हाण यांनी कालवश संजय लोणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला अन् गहिवरले…बैठकित न बसता प्रतिमेजवळच तब्बल अर्धातास बसले…!
अर्धापूर तालुक्यातील लोणी (खु) येथील सरपंच प्रतिनिधी,कृऊबा समीती नांदेडचे संचालक, संस्था चालक व अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक असलेले कालवश संजय लोणे यांचे बुधवारी निधन झाले.
लोणे कुटुंबीयांची शनिवारी अशोकराव चव्हाण यांनी लौणी (खू) येथे भेट घेतली, त्यांच्या सोबत सरचिटणीस संजय देशमुख लहानकर,युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, मारोती शंखतिर्थकर हे होते.यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले कि, संजय लोणेचे अष्टपैलू काम होते,तो माझ्या कुटुंबातील सदस्य होता,त्याच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांचे व काॅग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे,मी त्याच्या कुटुंबीयांसोबत नेहमी राहिल अशा भावना व्यक्त केल्या.
सरपंच अनुसयाबाई लोणे,राजू लोणे, महेंद्र लोणे,प्रजापती लोणे,शामराव लोणे, लक्ष्मणराव लोहकरे सरपंच विजय भुस्से,मुसव्वीर खतीब,व्यंकटराव साखरे,सोनाजी सरोदे,निळकठ मदने,राजू बारसे, शिवलिंग स्वामी,अमोल डोंगरे, ज्ञानेश्वर राजेगोरे, राजाराम पवार,राजू गायकवाड, संजय गोवंदे, शंकर ढगे, सुनिल लोहकरे,साहेबराव गव्हाणे, पंढरीनाथ क्षीरसागर, बालाजी क्षीरसागर,भैय्या क्षीरसागर,गौतम लोणे,भास्कर वैद्य, चंद्रमुणी लोणे, बालाजी सोनटक्के, दिपक लोणे, यशवंत लोणे याप्रसंगी यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.
या बातम्या देखील आपणास आवडतील
- शंकर नगरीतील ड्रेनेजलाइनचे भूमिपूजन -NNL
- तेलंगणाला विकास शक्य तर महाराष्ट्राला का नाही – मुख्यमंत्री केसीआर यांचा सवाल -NNL
- कामारी /दुधड जिल्हा परिषद गटातुन काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास निवडणुक लढविणार – त्रिरत्नकुमार मा,भवरे -NNL
- कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी मोहम्मद आरेफखान यांची निवड -NNL