
नवीन नांदेड। डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शहरी भागात जवळपास १८ जयंती मंडळाने भव्य मिरवणूक काढली यावेळी जय भीम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणेने परिसर दणाणून गेला, तर सिडको हडको परिसरातील बौद्ध विहारात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने १४ एप्रिल रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सार्वजनिक भिम जयंती मंडळ वाघाळा, नवयुवक जयंती मंडळ भिमवाडी, क्रांती सूर्य भिम जयंती मंडळ राहुल नगर सिडको, सार्वजनिक भिम जयंती मंडळ विश्वशांती मंडळ वाघाळा, भिम जयंती मंडळ वाजेगाव,भिम जयंती मंडळ कुशी नगर नवीन कौठा नांदेड,नवयुवक भिम जयंती मंडळ सुमेध नगर धनेगाव, सार्वजनिक भिम जयंती मंडळ बळिरामपुर, भिम शक्ती मंडळ रहिमपुर, नवयुवक भिम जयंती मंडळ वसरणी,भिम जयंती मंडळ शाहूनगर वाघाळा, दिक्षा नगर बळिरामपुर, भिम जयंती मंडळ संभाजी चौक सिडको, श्रावस्ती बौद्ध विहार हडको, हिमंतपुर बळिरामपुर नांदेड,भिम जयंती मंडळ पिपळगाव निमजी यासह सिडको हडको परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जयंती मंडळाचा वतीने बौद्ध विहारात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.


यात सिडको परिसरातील जेतवन बौद्ध विहार गुरू वार बाजार, पंचशील बौद्ध विहार हडको, नंदीग्राम बौद्ध विहार,संभाजी चौक, चंद्रमुणी,एनडी ४१,दिक्षा बौद्ध विहार राहुल नगर, प्रबुद्ध बौद्ध विहार, विश्वशांती वाघाळा यासह परिसरातील अनेक बौद्ध विहार मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
हडको येथुन ग्रामीण व शहरी भागातून मिरवणुक या मार्गाने असून सिडको मार्ग राज चौक सिडको कार्यालय,मार्गावरून नांदेड कडे गेली मिरवणूक मार्गावर ठिक ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात आले,यात अण्णाभाऊ साठे चौक सिडको येथे वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण शहर चा वतीने गोपाल सिंग टाक, थंड शितपेय वाटप करण्यात आले.


तर शिवाजी चौक येथे राजु निखाते मित्र मंडळ, राहुल गवारे व दिपक भरकड मित्र मंडळ, हडको,या मार्गावर व जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शहरी व ग्रामीण भागात,पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात,ऊपनिरीक्षक आंनद बिचेवार, महेश कोरे, डाकेवाड, बालाजी नरवटे,मटवाड यांच्या सह ११ अधिकारी व ८० कर्मचारी ६ महिला पोलीस कर्मचारी ४० होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
