
हदगाव। वाढदिवस साजरा करण्याची दिवसेंदिवस स्पर्धा लागली असुन वाढदिवसावर खूप अनाठायी खर्च केला जात आहे.माहीती अधिकार समिती अध्यक्ष दत्तात्रय अंनतवार कवानकर यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते गजानन अंनतवार आपला वाढदिवस दरवर्षी केक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अनाठायी खर्च न करता सामाजिक गरजु साठी मदत करीत वाढदिवस साजरा करतात.


यावर्षी पळसा येथील बापुराव पाटील आश्रमशाळा परीसरात संस्थेच्या अध्यक्षा हेमलता पाटील यांनी उभारलेल्या आदी शक्ती गो शाळेतील जनावरांना चारा म्हणून दोनशे कडब्याच्या पेंढ्या शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर भाजपा विधानसभा प्रमुख निळु पाटील यांच्या उपस्थितीत वाटप करीत वाढदिवस साजरा केला.तर पळसा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या पुढाकारातून कायापालट झालेल्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करून सामाजिक कार्यात सामाजिक कार्यकर्ते गजानन मस्के यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला. यावेळी कोहळीकर व निळु पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत आदर्श इतरांनी घेण्यासारखा असल्याचे सांगितले.


यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, भाजपा युवा तालुकाध्यक्ष निळु पाटील, आश्रमशाळेचे अधीक्षक संजय धरमुरे,पळसा संरपंच प्रतिनिधी रणजीत कांबळे, बामणी उपसंरपंच अक्षय पवार, शंकर जगदाळे, रयतेचे अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर, जिवनाकुंर सेवा भावी संस्थेचे संस्थापक हरीश्चद्र चिल्लोरे, सामाजिक कार्यकर्ते राजु पांडे हदगांव, बंडु माटाळकर निवघाबाजार, निवृत्ती वानखेडे मानवाडी, प्रभाकर दहिभाते बरडशेवाळा, पळसा ग्रामपंचायत सदस्य कामाजी निमडगे ज्ञानेश्वर हराळे यांच्या सह पत्रकार इस्माईल पिंजारी, भगवान कदम वाळकीकर, महेंद्र धोंगडे शिबदरा, तुषार कांबळे कवाना, दिपकराव पाटील, गजानन मस्के, राजु चिंचोलकर, अशोक जाधव, बालाजी चेपुरवार विकास कांबळे, प्रवीण लकडे, हरीभाऊ सुर्यवंशी, विकास सुर्यवंशी, डॉ सचिन सादुलवार यांच्या सह गो शाळेतील नागोराव धनवे,सोलेवाड, उपस्थित होते.

