
नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन चा गुन्हे शोध पथकाने सि. सि. टी.ही, फुटेज चा साह्याने दुचाकी मोटार सायकल चोरलेल्या चोराचा शोध लावुन चार चोरटयां कडून एकुण नऊ दुचाकी जप्ती करून तिन लाख विस हजारांच्या मुध्देमाल जप्त केला असून अनेक चोरीचा घटना या चोरटयां कडून उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली असून वरीषठ पोलीस अधिकारी यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचा अधिकारी व कर्मचारी याचे अभिनंदन केले आहे.


या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रका नुसार,नांदेड शहरामध्ये वाढत्या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचे बाबतीत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड,अविनाश कुमार,अपर पोलीस अधिक्षक, नांदेड,डॉ. सिध्देश्वर भोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, नांदेड यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन यांना मासीक गुन्हे बैठकीच्या वेळी सुचना देऊन मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाना आळा घालून जास्तीत जास्त मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्त करणेबाबत आदेशीत केले.


सदर सुचनांप्रमाणे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण होत चालु वर्षात ज्या ज्या ठिकाणी मोटार सायकल चोरीचे गुन्हे घटले आहेत, त्या त्या ठिकाणी जाऊन तेथील सि.सी.टी.व्ही. फुटेज चेक करून गुन्हेगारांचे नांव निष्पन्न करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिल्या होत्या, त्या नुसार पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथक प्रमुख आनंद बिचेवार, पोलीस उप निरीक्षक, पोहेकॉ प्रभाकर मलदोडे, पोहेकॉ विक्रम वाकडे, पोहेकॉ प्रमोद क-हाळे, पोहेकॉ संतोष जाधव, पोकों विश्वनाथ पवार, पोकों चंद्रकांत स्वामी, पोका संतोष बेलुरोड हे मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व ठिकाणचे सिसिटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीतांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत होते.


त्यांना माहिती मिळाली की, पो.स्टे. नांदेड ग्रामीण गुरनं 217/2023 कलम 379 भादंवि मधील चोरलेली मोटार सायकल व मोटार सायकल चोरणारे चोरटे हे कोटीतीर्थ, तामसा, वारंगा भागात राहणारे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सायबर सेलचे पोहेकॉ राजेंद्र सिटीकर यांचे मदतीने गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमलदार यांना पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी मा. वरिष्ठांचे परवानागीने हदगाव परिसरात रवाना करुन गुन्हेगारांचा शोध घेतला असता आरोपी म्हाळसाकांत उर्फ गगण मारोती उराडे, वय 24 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. कोटीतीर्थ ता. जि. नांदेड, अभिषेक विश्वभर नागठाणे, वय 22 वर्ष, व्यवसाय मॅकॅनिक रा. तामसा ता. हादगाव जि. नांदेड, केशव व्यंकटराव शेंबेटवाड, वय 22 वर्षे, रा. खरटवाडी ता. हदगाव जि. नांदेड, कृष्णा शिवाजी जिनेवाड, वय 21 वर्षे, रा. वारंगा फाटा, ता. कळमनुरी जि. हिंगोली हे मिळून आले त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी वर नमुद गुन्हयातील मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.

त्यावरून चारही आरोपीतांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीच्या एकुण 09 मोटार सायकली किंमती 3,25,000/- रुपये (तीन लाख पंचविस हजार रुपये) काढून दिल्याने त्या जप्त करून ताब्यात घेण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलीचे वर्णन खालीलप्रमाणे असुन त्याचेकडून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील (02). पोलीस स्टेशन भाग्यनगर येथील (02). पोलीस स्टेशन वजिराबाद येथील (01). पोलीस स्टेशन अर्धापुर येथील (01). पोलीस स्टेशन मनाठा येथील (01), पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी. लातुर जिल्हा लातुर येथील (01), पोलीस स्टेशन दत्तवाडी पुणे शहर येथील (01) गुन्हा असे एकुण 09 गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदर चोरटयांनी फक्त हिरो- हॉन्डा स्पेंडर प्लस या मोटार सायकलचे लॉक तोडून आणि डुपलीकेट चाबीचा वापर करुन हिरो होन्डा कंपनीचे स्प्लेंडर मोटार सायकलला टार्गेट करुन सदरच्या मोटार सायकल चोरलेल्या असल्याचे चोरटे सांगत आहेत.

सदर कारवाई बाबत पोलीस अधिक्षक, नांदेड श्री श्रीकृष्ण कोकाटे , अपर पोलीस अधिक्षक, नांदेड श्री अविनाश कुमार , उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि आनंद बिचेवार, पोहेकॉ बालाजी लाडेकर, पोहेकॉ प्रभाकर मलदोडे, पोहेकॉ विक्रम वाकडे, पोहेकॉ प्रमोद क-हाळे, पोहेकॉ संतोष जाधव, पोकों विश्वनाथ पवार, पोक चंद्रकांत स्वामी, पोकर संतोष बेलूरोड यांचे विशेष कौतुक केले आहे.