
हदगाव| अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित दत्तनगर हदगाव येथे ६२ जणांनी महारक्तदान शिबिरात आपले रक्तदान केले.


अध्यात्मिक सेवेला सामाजिक जोड देण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आयोजित महा रक्तदान शिबिरात 62 सेवेकरांनी रक्तदान करून प्रशस्तीपत्र व रक्तदाता कार्ड घेतले. कोरोना काळात रक्ताची रुग्णांना अत्यंत गरज भासत होती त्या काळात आपल्या सेवेकरयानी जास्तीत जास्त रक्त देऊन कोरोना काळात मदत केली त्यामुळे आपल्या सेवेकरयाना कोरोना झाला नाही .करू रक्तदान देऊ अनेकांना जीवनदान असे महान कार्य आपल्या हातुन घडत आहेत.


या महारक्तदान शिबिरासाठी डॉक्टर शंकरराव चव्हाण व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील रक्तपेढी विभागातून रक्तदान शिबिरासाठी दीपक वानखेडे, बालप्रसाद भालेराव, डॉ. सस्कृति कुरुडे, लक्ष्मण येळणे, संदीप कुलकर्णी ,अजय राठोड, नागेश उराडे, श्रीमती उमरग यांनी 27 जणांचे रक्त संकलन केले. तर जिजाई ब्लड सेंटर नांदेड चे सुमेध महाबळे ,गंगाधर पवार, सोनाली गोडबोले ,संध्या कुलकर्णी, विद्या कदम ,प्रियंका देऊळवाड आदींनी३५ जणांचे रक्तदान संकलन केले. सदरील कार्यक्रम श्री स्वामी समर्थ मंदिर दत्तनगर हदगाव येथे संपन्न झाला

