
नवीन नांदेड। भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वा. सिडको येथील श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण सभागृह सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी जनसंपर्क कार्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रा. अशोक मोरे हे होते तर व्यासपीठावर सिडको ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विनोद कांचनगिरे, माजी नगरसेविका तथा साहित्यिक प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे, डॉ. नरेश रायेवार, शेख लतीफ, किशनराव रावणगावकर, आहात खान पठाण, मोहम्मद नुरुद्दीन, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कांचनगिरे यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर विस्तृतपणे अभ्यासपूर्ण विवेचन करून. सविस्तर असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. अशोक मोरे यांनी केला, सूत्रसंचालन प्रा. गजानन मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रमेश नांदेडकर यांनी मानले, यावेळी भि.ना. गायकवाड ,संतोष कांचनगिरे, गजानन कहाळेकर, संजय कदम, शंकरराव धिरडीकर,युसुफ शेख, भगवान जोगदंड, शिवाजी कुंभारे, देविदास कदम, नामदेव पद्मने, वैजनाथ माने, शशिकांत हटकर,तुकाराम कांबळे, प्रभू राम, संगम कांचनगिरे, माणिकराव श्रोते, सौ.अनिता गज्जेवार,सौ. विमलबाई चित्ते,सौ.ललिता कामतीकर, श्रीमती अरुणाबाई करडखेले, श्रीमती पुष्पाबाई घरटे, श्रीमती मस्के बाई, श्रीमती ठाकूर बाई, श्रीमती गोवंडी बाई, पंढरीनाथ रोडे, काशिनाथ गरड, गिरडे ,अक्षय मुपडे, विश्वनाथ शिंदे, भुजंग स्वामी, केरबा माने, यांच्यासह सर्व सिडको हडको भागातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

