
नांदेड। सकाळच्या वेळी रस्त्याने पायी निघालेल्या एका महिलेल्या गळातील तब्बल एक लाख रूपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना शारदा नगर भागात दि. १६ रोजी घडली. यावेळी महिलेने आरडाओरड केली मात्र चोरटयांनी धुमस्टाईल पोबारा केला. दरम्यान रस्त्यावरून जाणाºया नागरिकांसह महिलांचे दागिने लुटणाºया चोरट्यांची टोळी पून्हा सक्रिय झाल्यान भितीचे वातावरण पसरले आहे.


नांदेड शहरातील डी मार्ट परिसर, चैतन्यनगर, आनंदनगर, महसूल कॉलनी, बाबानगर, कौठा परिसरात सकाळच्या वेळी वॉकिंगसाठी फिरणाºया नागरिकांकडून मोबाईल व अन्य ऐवज आणि महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटना मागील काही महिन्यात वाढल्या होत्या.


या धुमस्टाईल चोरटयांनी घातलेल्या धुमाकुळाने महिलांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी यातील काही गुन्हे उघड करून आरोपी पकडून मुद्देमालही जप्त केला होता. यामुळे रस्त्यावरील या घटना काही प्रमाणात कमी झाल्या. मात्र पून्हा धुमस्टाईल चोरटयांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. दि. १६ रोजी सकाळी ८.५० च्या सुमारास शारदा नगरातील गणपती अपारमेंट समोरून व्दारका मधुकर गव्हाने या महिला आपल्या घराकडे पायी निघाल्या होत्या.


त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या २० ते २५ वर्ष वयोगटातील दोन अज्ञात चोरटयांनी या महिलेच्या गळयातील एक लाख रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले. महिलेने यावेळी आरडाओरड केली मात्र तोपर्यत चोरटयांनी पोबारा केला. या प्रकरणी व्दारका गव्हाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर परिसरात काही महिन्यापूर्वी महिलांचे दागिने लुटणाऱ्या धुम स्टाईल चोरटयांनी धुमाकुळ घातला होता. आता पून्हा चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

दोन्ही दरोडेखोर पकडले
शारदानगर येथील या महिलेची तक्रार दाखल होताच २४ तासाच्या आत एक लाखाचे गंठण हिसकावून नेणाºया दोन्ही दरोडेखोरांना विमानतळ पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरिक्षक जाधव, उपनिरिक्षक जाधव, अंमलदार दारासिंग राठोड, डोईफोडे आणि गंगाधर गंगावरे यांनी तत्परतेने शोध घेऊन दोन दरोडेखोरांना अटक केली. राजेश उर्फ राजू संजय चंदनशिवे रा.नवजीवननगर व मनोज उर्फ गोट्या जोगदंड रा.मालेगाव रोड अशी या दोघांची नावे आहे. केवळ २४ तासाच्या आत या जबरी चोरीचा उलघडा केल्याबद्दल पोलिसअधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पथकाचे कौतुक केले.
