Friday, June 9, 2023
Home खास न्यूज नायगाव शहरांमध्ये राम जन्मोत्सवाची शोभायात्रा युवा नेते प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

नायगाव शहरांमध्ये राम जन्मोत्सवाची शोभायात्रा युवा नेते प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

कैलास पाटिल शिंदे, अध्यक्ष श्रीराम जन्मोत्सव समिती नायगाव

by nandednewslive
0 comment

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव शहरांमध्ये राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये नायगाव,उमरी, धर्माबाद,बिलोली, देगलूर,नांदेड,या तालुक्यातील जवळजवळ दहा ते पंधरा हजार रामभक्त उपस्थित होते.जन्मोत्सव समितीच्या वतीने अतिशय सुंदर अशी शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आली शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणून प्रभू श्रीरामाची वीस फुटाची मूर्ती, गोमातेचे दर्शन,जटाधारी महादेवांचा जिवंत देखावा ,रामभक्त बजरंग बली हनुमानांचा जिवंत देखावा,यासह छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, हुतात्मा पानसरे ,महात्मा बसवेश्वर महाराज या महामानवांचे विचार प्रतिमारुपी देखावे शोभायात्रेमध्ये सहभागी होते.शोभायात्रा राजुरा मारुती हनुमान मंदिर नायगाव या ठिकाणाहून ठीक चार वाजता निघाली आणि प्रभू श्रीराम मंदिर नायगाव येथे शोभा यात्रेची सांगता झाली.

नायगाव शहरातील अनेक नामवंत व्यापाऱ्यांनी शोभायात्रेत सहभागी असणाऱ्या रामभक्तांच्या पिण्याच्या थंड पाणी थंड शरबत,थंड मठा,मसालेदार चना.खिचडी. असे विविध खाद्यपदार्थाचे वाटप व्यापारी बांधवांनी केले. शोभायात्रेसाठी सर्व संयोजन समितीने अतिशय काटेकोरपणे नियोजन केले होते.पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये प्रा. युवानेते रवींद्र चव्हाण यांनी राम भक्तांच्या भावनेचा आदर करून शोभायात्रा संपेपर्यंत डीजे चालू ठेवण्याची जबाबदारी स्वतः घेतली.नायगाव पोलीस प्रशासनही त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे प्रा.युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या सहकार्यामुळे शोभायात्रा शेवटपर्यंत कुठलाच अनुचित प्रकार न घडता पार पडली त्याबद्दल सर्व समितीच्या समिति अध्यक्ष कैलास पाटील शिंदे यांनी यांचे आभार व्यक्त केले. तसेच पोलीस प्रशासन ,महावितरण कर्मचारी व सर्व नायगाव परिसरातील राम भक्तांचे सुद्धा आभार मानले .

शोभायात्रा अतिशय उत्तमरीत्या पार पडल्यामुळे श्री प्रभू रामचंद्र शोभायात्रा समिती अध्यक्ष कैलास पा.शिंदे ,उपाध्यक्ष सचिन पाटील कल्याण,अविनाश चव्हाण (सचिव), प्रवीण शिंदे (कोषाध्यक्ष) गजानन भालेराव उपोषाध्यक्ष हेमंत बोमनाळे ,बंटी शिंदे( प्रसिद्धी प्रमुख) अभिजीत मंगरुळे, गुरुनाथ चव्हाण ,गजानन बादवाड ,राजू बादवाड,शिवा रामदिनवार,रितेश कल्याण, गजानन चव्हाण ,गणेश पेकमवार,गजानन शिरडकर या सर्व समितीतील प्रमुखांचे माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने प्रा.रवींद्र चव्हाण यांनी सत्कार केला. श्री शिवराज पाटील होटाळकर संजय आप्पाजी बेळगे श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी सुद्धा शोभायात्रेतील समितीतील प्रमुखांना शुभेच्छा दिल्या .

प्रा.रविंद्र चव्हाण यांनी आपल्या सत्कारपर मनोगतामध्ये सर्व राम भक्तांना नम्र विनंती केली की नायगाव शहरांमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वच कार्यक्रम अतिशय शांतपणे पार पडत असतात या रामजन्मोत्सव शोभायात्रेत अतिशय मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या सर्व युवकांनी राम जन्मोत्सवाचा आनंद अतिशय मनसोक्त पणे घ्यावा आणि शांततेमध्ये या शोभायात्रेला पार पाडण्याचे आवाहन प्रा.रवींद्र चव्हाण यांनी केले .शोभायात्रा सुरू होण्याच्या स्थळापासून ते शोभायात्रा संपणाऱ्या स्थळापर्यंत रवींद्र चव्हाण सोबत राहून अतिशय शांतपणे ही यात्रा संपवण्यात सहकार्य केले.

मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील चव्हाण याच्या वतीने श्री प्रभू रामचंद्र ,श्री प्रभू लक्ष्मण,सीतामाता व हनुमानजी यांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी मुर्त्यांची व्यवस्था करून दिली . शोभायात्रा यशस्वी करण्यामध्ये श्री प्रभू रामचंद्र शोभायात्रा समितीतील सर्व प्रमुख व सुधाकर पाटील शिंदे ,पांडू पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, संजय पाटील चव्हाण, विठ्ठल आप्पा बेळगे ,साईनाथ चनावार, शंकर चव्हाण ,उमेश चव्हाण ,मनोज बेळगे ,माधव शिंदे अजिंक्य कल्याण,रामदिनवार ,पेकमवार, पिंटू शिंदे वसंत शिंदे सर्व व्यापारी बांधव मुनीम संघटनेचे सर्व पदाधिकारी व्यापारी बांधव व समस्त रामभक्त सहकार्य केले तर शोभायात्रेचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!